मुंबईत वीजदर 18 % वाढविण्याचा बेस्टचा प्रस्ताव; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सरकार स्वीकारणार??


प्रतिनिधी

मुंबई : मुंबईकरांना खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे, कारण बेस्टने १८ % वीजदर वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. एप्रिलपासून मुंबईकरांच्या वीज बिलात ही वाढ होण्याची शक्यता आहे. पण येत्या काही महिन्यात महापालिकेची निवडणूक आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकार वीज दरवाढीचा हा प्रस्ताव स्वीकारणार का??, हा खरा प्रश्न आहे. BEST’s proposal to increase electricity tariff by 18% in Mumbai

काही दिवसांपूर्वीच अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यात आता बेस्टनेही दरवाढ सुचवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना महागाईची झळ आणखी सोसावी लागण्याची चिन्हे आहेत.



बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळणार आहे. या वीज ग्राहकांसाठी बेस्टने 6 % शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबईकरांना महागाईचा झटका बसणार आहे. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

अर्थात येत्या काही महिन्यांमध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना आधीच महागाईची झळ बसत असताना शिंदे फडणवीस सरकार वीज दरवाढीचा चटका देऊ शकेल का??, हा प्रश्न आहे.

BEST’s proposal to increase electricity tariff by 18% in Mumbai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात