नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन विवाहितेवर गेल्या सहा महिन्यांत ४०० वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबाजोगाईतील आहे. पीडित विवाहिता दोन महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी बाल कल्याण समितीने पीडितेचा गर्भपात करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.Beed minor married woman raped by 400 people in last six months
प्रतिनिधी
अंबाजोगाई : नोकरीचे आमिष दाखवून अल्पवयीन विवाहितेवर गेल्या सहा महिन्यांत ४०० वेळा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना अंबाजोगाईतील आहे. पीडित विवाहिता दोन महिन्यांची गर्भवती आहे. याप्रकरणी बाल कल्याण समितीने पीडितेचा गर्भपात करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे.
पीडितेच्या तक्रारीनंतर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या वडिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी अंबाजोगाई शहरातील सर्व लॉजची झडती घेऊन सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे प्रकरण?
पीडिता अल्पवयीन असून ती मजूर कुटुंबातील आहे. पीडित मुलीच्या आईचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. आईच्या मृत्यूनंतर पीडितेच्या वडिलांनी तिचे लग्न लावून दिले. पीडित मुलगी लग्नानंतर दीड वर्ष तिच्या सासरच्या घरी राहत होती. मात्र सासूच्या सततच्या छळामुळे ती माहेरी परतली. माहेरी आल्यानंतर पीडित मुलगी नोकरी शोधण्यासाठी शहरात गेली. अंबाजोगाई शहरातील एका अकादमीत तिची दोन जणांशी भेट झाली. नोकरी लावण्याच्या नावाखाली दोघांनी पीडितेवर बलात्कार केला. यानंतर पीडितेवर वेगवेगळ्या लोकांनी सहा महिने वारंवार बलात्कार केला. पीडितेच्या तक्रारीनुसार, तिच्यावर 400 हून अधिक वेळा बलात्कार झाला. पीडिता आज 20 आठवड्यांची गरोदर आहे. पीडितेने तिच्यासोबतची ही वेदनादायक घटना बाल कल्याण समितीच्या सदस्यांना सांगितली.
पोलिस कर्मचाऱ्यांवरही बलात्काराचा आरोप
पीडित मुलीने यापूर्वी अंबाजोगाई शहर पोलिसांत बलात्काराची तक्रार दिली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची तक्रार ऐकून घेतली नाही. एवढेच नाही तर त्यावेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तिला एका लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी केलेल्या बलात्काराच्या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी दिले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App