खोटे बोलणारे बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडत नव्हते.म्हणून असे बोलणाऱ्यांना त्यांनी शिवसेनेतून हाकलून दिले हा देखील इतिहास आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला.Balasaheb Thackeray expelled the liars from Shiv Sena, Uddhav Thackeray slammed Narayan Rane
विशेष प्रतिनिधी
कणकवली : खोटे बोलणारे बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडत नव्हते.म्हणून असे बोलणाऱ्यांना त्यांनी शिवसेनेतून हाकलून दिले हा देखील इतिहास आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लगावला.
,चिपी विमानतळ उद्घाटन प्रसंगी उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांची जुगलबंदी चांगलीच रंगली. तुमचे लोकप्रतिनिधी चुकीची कामे करत आहेत. त्यांच्यामागे गुप्तचर लावून माहिती घ्या असा सल्ला दिला. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे खोटे बोलणाऱ्यांना थारा नव्हता असेही ते म्हणाले. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, खोटे बोलणारे बाळासाहेब ठाकरे यांना अजिबात आवडत नव्हते.म्हणून असे बोलणाऱ्यांना त्यांनी शिवसेनेतून हाकलून दिले हा देखील इतिहास आहे,
कोकणच्या मातीचा उल्लेख करून झाड बाभळीचे उगवलं तर त्यात दोष मातीचा कसा..? असा टोलाही ठाकरे यांनी लगावला. ते म्हणाले, काहीजण तळमळीने बोलले आणि काहीजण मळमळीने बोलले. राणे यांनी भाषणात आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास केल्याचे म्हटले होते.यावर टोला लगावताना सिंधुदुर्ग किल्ला शिवाजी महाराज यांनी बांधला. मला वाटते हेच खरे आहे..नाहीतर कोण तरी म्हणेल मीच बांधला. लघु असेना पण केंद्रातील मोठं खाते नारायणराव तुमच्याकडे आहे.चांगल्या कामाला नजर लागू नये म्हणून काळ तिट लावावे लागते, असेही ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App