आर्यन खानच्या जामिनावर सोमवारी पुन्हा सुनावणी

क्रूज ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी शनिवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. एनसीबी आर्यनच्या जामिनालाही विरोध करणार आहे.Aryan Khan’s bail hearing on Monday


विशेष प्रतिनिधी

मुंबई: क्रूज ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी शनिवारी संध्याकाळी सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. परंतु त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. एनसीबी आर्यनच्या जामिनालाही विरोध करणार आहे.

आर्यन खानच्या अडचणीत सातत्याने वाढतच आहेत. NCB कोठडीत 6 रात्री घालवल्यानंतर, त्याने दोन रात्री न्यायालयीन कोठडीत काढल्या आहेत, परंतु जामीन मिळण्याबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत. ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला अचित कुमारही न्यायालयीन कोठडीत आहे.एनसीबी न्यायालयात युक्तिवाद करू शकतो की त्यांना या दोघांची समोरासमोर चौकशी करायची आहे, त्यामुळे आर्यनला जामीन देऊ नये. जर न्यायालयाने एनसीबीचा हा युक्तिवाद मान्य केला तर आर्यनला आणखी काही दिवस तुरुंगात काढावे लागतील.

Aryan Khan’s bail hearing on Monday

महत्त्वाच्या बातम्या