अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलासा


विशेष प्रतिनिधी 

मुंबई  : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग सत्र न्यायालयातील खटल्याला गैरहजर राहण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाने आज दिली.Arnab Goswami gets relif from court

तसेच, पुढील सुनावणीपर्यंत याप्रकरणी कठोर कारवाई करण्यापासूनही न्यायालयाने गोस्वामी यांना दिलासा दिला आहे.नाईक यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या आईसह आत्महत्या केली आहे.



याप्रकरणी गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिबाग सत्र न्यायालयाने या खटल्याची कारवाई सुरू केली आहे. या सुनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी तिघांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत केली आहे.

तसेच पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणीही केली आहे. शुक्रवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. पुढील सुनावणी २३ एप्रिल रोजी खंडपीठाने निश्चित केली आहे. तोपर्यंत न्यायालयाने दिलेला दिलासा कायम राहणार आहे.

Arnab Goswami gets relif from court

हे ही वाचा

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात