टीआरपी घोटाळ्यावरून न्यायालयाने मुंबई पोलीसांना फटकारले, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे आहेत तर त्यांचे नाव आरोपपत्रात का नाही?

टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींविरोधात ठोस पुरावे आहेत तर आरोपपत्रात त्यांचे नाव का नाही? त्यांच्यासह रिपब्लिक वाहिनीची मालकी असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर संशयित आरोपी म्हणून किती काळ टांगती तलवार ठेवणार? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले आहे.  Court slams Mumbai police over TRP scam


विशेष प्रतिनिधी

मुंबई : टीआरपी घोटाळ्यात रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामींविरोधात ठोस पुरावे आहेत तर आरोपपत्रात त्यांचे नाव का नाही? त्यांच्यासह रिपब्लिक वाहिनीची मालकी असलेल्या कर्मचाऱ्याच्या डोक्यावर संशयित आरोपी म्हणून किती काळ टांगती तलवार ठेवणार? अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना फटकारले आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईपासून संरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी गोस्वामी आणि रिपब्लिक वाहिनीची मालकी असलेल्या एआरजी आऊटलियर मीडियाने याचिका केली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्राला आव्हान देतानाच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणीही केली आहे. यावर न्यायालयाने म्हटले आहे की, गोस्वामी यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का, प्रकरणाचा तपास किती वेळात पूर्ण करणार हे गुरुवारी सुनावणीवेळी स्पष्ट करावे.न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर टीआरपी घोटाळा प्रकरणाची सुनावणी सुरू असून बुधवारी न्यायालयाने पुन्हा एकदा पोलिसांच्या तपासाबाबत प्रश्न उपस्थित केला. गोस्वामी आणि कंपनीच्या अन्य कर्मचाºयांना आरोपी का करत नाही, असा प्रश्न करताना फौजदारी कायद्यामध्ये संशयित असे काही असल्याचे आम्हाला वाटत नाही, असेही न्यायालयाने सुनावले. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आपल्यावर कारवाई केली जाईल या भीतीखाली याचिकाकर्ते आहेत, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.

गोस्वामी आणि कंपनीतर्फे अ‍ॅड. अशोक मुंदरगी यांनी बुधवारीही युक्तिवाद केला. पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह कंपनीच्या बºयाच कर्मचाºयांना संशयित आरोपी दाखवले आहे. मात्र त्यांना आरोपी दाखवू शकतील असा पुरावा पोलिसांकडे नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास अखंड सुरू ठेवू शकत नाहीत. त्यांच्याकडे गोस्वामी आणि कंपनीच्या अन्य कर्मचाऱ्यांविरोधात पुरावे असतील तर पोलिसांनी त्यांना आरोपी दाखवावे त्यावर आमच्याकडे पुरेसा पुरावा असून अतिरिक्त पुरावा गोळा करण्याचे काम सुरू असल्याचा दावा विशेष सरकारी वकील शिरीष हिरे यांनी केला.

गेल्या तीन महिन्यांपासून तुम्ही या प्रकरणाचा तपास करत आहात. या प्रकरणी दोन आरोपपत्रेही दाखल करण्यात आली आहेत. असे असतानाही याचिकाकर्त्यांविरोधात मात्र कोणताही पुरावा असल्याचे दिसून येत नाही, अशा शब्दांत न्यायालयााने मुंबई पोलीसांना फटकारले आहे. या घोटाळ्याप्रकरणी ऑक्टोबर २०२० मध्ये गुन्हा दाखल झाला असून आता आपण मार्च २०२१ मध्ये आहोत. तुम्ही याचिकाकर्त्यांना आरोपीही करत नाहीत. त्यामुळे गोस्वामी आणि कंपनीच्या अन्य कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर संशयित आरोपी म्हणून टांगती तलवार का ठेवायची, असा प्रश्न न्यायालयाने पोलिसांना केला.

Court slams Mumbai police over TRP scam

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*