विशेष प्रतिनिधी
यवतमाळ : अभिनेते- अभिनेत्री जाहीर कार्यक्रमांसाठी पैसे आकारतात हे उघड गुपीत आहे. त्यामध्ये काही गैरही असण्याचे कारण नाही. परंतु, बलात्काराचा आणि एका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप असलेल्या आमदाराच्या कार्यक्रमाला जाऊन अभिनेत्री प्राजक्ता माळीने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.Applause showers of actress on MLA accused of rape by
यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे माजी मंत्री आणि आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्राजक्ता माळी म्हणाली, संजय राठोड यांनी या शहराचा चेहरामोहरा बदलला. कबड्डी खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवणारं हे शहर आता अपराजित आमदार संजय राठोड यांचा मतदारसंघ म्हणून ओळखले जाते. यात सर्वकाही आले.
पूजा चव्हाण या बावीस वर्षीय तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणात तत्कालिन वनमंत्री संजय राठोड यांचे नाव घेण्यात आले होते. पूजाच्या मोबाईलमधून पुणे पोलिसांना कॉल रेकॉर्डिंग सापडले होते. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं.
हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या पाच-सहा दिवसांपूवीर्चे असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला होता. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा लागला होता.
त्यानंतर संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. महिलेने या प्रकरणी आमदार राठोड यांच्या विरुद्ध घाटंजी पोलिस व पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्र पाठविले होते. त्यात महिलेने आमदार संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
याच संजय राठोड यांच्या कार्यक्रमात प्राजक्ता माळी सहभागी झाली होती. राठोड यांनी आपल्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी सिनेकलावंतांना बोलावले होते. एकीकडे राज्यात वाढत्या कोविड संसगार्मुळे राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे.
तरीही सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार विकास कामाचा मोठा वाजागाजा करत भूमिपूजन केले. दरम्यान या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कलावंतांना बोलावण्यात आल्याचाही आरोप होतोय. सिने कलाकारांना बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App