सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री उत्तर द्या, महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे १२ हजार मृत्यू कसे झाले? आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांचा दावा


महाराष्ट्रात जानेवारी ते मे या दरम्यान ४९ हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील किमान २५ टक्के म्हणजे १२ हजार मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला असल्याचा दावा इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला आहे. देशातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या जाणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी याबाबत उत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे.Answer, how did 12,000 deaths due to lack of oxygen in Maharashtra? Former IMA president Dr. Avinash Bhondwe claims


प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्रात जानेवारी ते मे या दरम्यान ४९ हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला. यातील किमान २५ टक्के म्हणजे १२ हजार मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाला असल्याचा दावा इंडियन मेडीकल असोसिएशनचे माजी महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी केला आहे. देशातील सर्वोत्कृष्ठ मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या जाणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी याबाबत उत्तर देण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात कहर माजविला होता. रुग्णालयात असणाºयांचे ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाले. अनेकांना हॉस्पीटलमध्ये बेड मिळाले नाहीत त्यामुळे त्यांनी दम तोडला.डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले,जानेवारी ते मे दरम्यान महाराष्ट्रात ४९ हजार रुग्णांचा कोरोनमुळे मृत्यू झाला. यामध्ये फेब्रुवारीमध्ये १२ हजार, एप्रिलमध्ये १३ हजार आणि मे महिन्यात २४ हजार रुग्णांचा मृत्यू झाला. यातील २५ टक्के मृत्यू हे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे झाले आहेत.

महाराष्ट्रात या काळात सर्वाधिक कोरोनाचे मृत्यू होते. राज्यात दररोज हजार ते बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. मात्र, अनेक रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे रुग्णालयात असणाºया अनेकांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळाला नाही.

त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या काळात हॉस्पीटलमध्ये बेड मिळत नव्हते. वास्तविक हॉस्पीटलमध्ये बेड शिल्लक असले तरी ऑक्सिजनच नसल्याने उपचार कसे करणार? असा प्रश्न डॉक्टरांपुढे होता. त्यामुळे बेड शिल्लक नसल्याने रुग्णांना दाखलही करून घेण्यात येत नव्हते. त्यामुळेही अनेकांनी घरीच प्राण गमावले.

वास्तविक महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यातच ऑक्सिजन टास्क फोर्स तयार करण्यात आले होते. मात्र, या टास्क फोर्सने कामच केले नाही. त्यामुळे शहरांमध्ये ऑक्सिजन प्लॅँट उभारण्यातच आले नाहीत. ज्याठिकाणी जिल्हाधिकारी अ‍ॅक्टीव्ह होते त्यांनी ऑक्सिजनची व्यवस्था केली.

मात्र, पुणे, नाशिक, मुंबई, नागपूर, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांमध्ये कोणतेही काम झाले नाही. उस्मानाबाद जिल्ह्याचे उदाहरण घेतले तर कौस्तुभ दिवेगावकर यांच्यासारख्या अ‍ॅक्टीव्ह जिल्हाधिकाºयानेच याला गंभीरपणे घेतले.

त्यांनी उस्मानाबादमध्ये दररोज १० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती क्षमता असलेला प्लॅँट उभारला. त्यामुळे पहिल्या लाटेत ३.२ टक्के मृत्यूदर असलेल्या उस्मानाबादमध्ये मृत्यूदर अर्ध्यावर आला. मात्र, दिवेगावरकर यांनी दाखविलेली तडफ महाराष्ट्रात इतरत्र दाखविली नाही.

सेनापती म्हणून घरी बसून लढतोय म्हणणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे किंवा आरोग्य मंत्री राजेश टोप यांनी किंवा अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासारख्या पालकमंत्र्यांनी याबाबत काहीही केले नाही.

त्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊन अनेकांचे मृत्यू झाले. ग्रामीण भागात तर ऑ क्सिजन प्लॅँट उभारण्यासाठी एकाही मंत्र्याने प्रयत्न केले नाहीत. त्याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील मृत्यूचे प्रमाण वाढले.

Answer, how did 12,000 deaths due to lack of oxygen in Maharashtra? Former IMA president Dr. Avinash Bhondwe claims

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी