
वृत्तसंस्था
मुंबई : अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ केली आहे. नवीन दर 17 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. याआधी मार्चमध्येही दरात वाढ करण्यात आली होती. 500 मिली अमूल गोल्डची किंमत 31 रुपये आणि अमूल शक्तीची किंमत 28 रुपये असेल. मदर डेअरी बुधवारपासून फुल क्रीम दुधाची किंमत 59 रुपये प्रति लिटरवरून 61 रुपये प्रति लिटर करणार आहे.Amul and Mother Dairy’s milk up by Rs 2 New rates in effect, hike by Rs 4 per liter from March
मार्चमध्ये भाव वाढले
1 मार्च रोजी अमूल आणि मदर डेअरी या दोन्ही कंपन्यांनी दुधाच्या दरात वाढ केली होती. सध्या, अमूल गोल्डची किंमत 30 रुपये प्रति 500 मिली, अमूल ताझा 24 रुपये प्रति 500 मिली आणि अमूल शक्ती 27 रुपये प्रति 500 मिली आहे. तर मदर डेअरीच्या फुल क्रीम दुधाची किंमत सध्या 59 रुपये प्रतिलिटर आहे. टोन्ड दुधाची किंमत 49 रुपये, डबल टोन्ड दुधाची किंमत 43 रुपये आणि गायीच्या दुधाची किंमत 51 रुपये आहे.
पशुखाद्य महागल्याने दरात वाढ
ऑपरेशन कॉस्ट आणि दूध उत्पादन खर्च वाढल्याने अमूलने दर वाढल्याचे कारण दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पशुखाद्याच्या किमतीत सुमारे 20% वाढ झाली आहे. निविष्ठा खर्च आणि पशुखाद्यातील वाढ पाहता, अमूल फेडरेशनशी संलग्न असलेल्या दूध संघांनीही शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरात गेल्या वर्षीच्या तुलनेत 8-9% वाढ केली आहे.
दूध उत्पादकांना एक रुपयापैकी 80 पैसे
त्यांच्या धोरणांतर्गत अमूल ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रत्येक 1 रुपयापैकी 80 पैसे दूध उत्पादकांना देते. किमतीत सुधारणा झाल्याने दूध उत्पादकांना मदत होईल आणि त्यांना अधिक दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळेल. या वाढीमुळे मार्चपासून दुधाचे दर प्रतिलिटर चार रुपयांनी वाढले आहेत.
मदर डेअरी आणि अमूल आघाडीचा ब्रँड
मदर डेअरी ही दिल्ली-एनसीआर बाजारपेठेतील प्रमुख दूध पुरवठादारांपैकी एक आहे आणि पॉली पॅक आणि व्हेंडिंग मशीनद्वारे दररोज 3 दशलक्ष लिटरहून अधिक दूध विकते. त्याच वेळी, अमूल हा देशातील अग्रगण्य ब्रँड आहे, ज्याची मालकी लाखो शेतकऱ्यांची आहे. गुजरातच्या दोन गावांमधून 75 वर्षांपूर्वी 247 लिटर दुधापासून सुरू झालेला प्रवास आज 260 लाख लिटरपर्यंत पोहोचला आहे.
Amul and Mother Dairy’s milk up by Rs 2 New rates in effect, hike by Rs 4 per liter from March
महत्वाच्या बातम्या
- 17 ऑगस्ट 2022 : राष्ट्रगीत समूह गायन, विश्वविक्रमाची संधी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
- गुजरातमध्ये 1000 कोटींचे 513 किलो MD ड्रग्ज जप्त!!; मुंबई पोलिसांची कारवाई
- फिफाने भारताला दिला दणका, एआयएफएफचे निलंबन; महिला विश्वचषकाचे यजमानपदही हिसकावले
- वंदे मातरमला विरोध : रझा अकादमीच्या पावलावर काँग्रेसचे पाऊल!!