वृत्तसंस्था
श्रीनगर : काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी सकाळी 11.10 वाजता इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्सची (ITBP) बस 100 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जवान शहीद झाले. बसमध्ये ITBPचे 39 जवान आणि 2 जम्मू-काश्मीर पोलिस कर्मचारी स्वार होते.7 dead, 41 on board when ITBP jawan bus falls into ravine; Accident while returning from Amarnath Yatra duty
बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेतील ड्यूटीवरून सर्व जवान परतत होते.
अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू असलेल्या चंदनवाडी येथून जवान पहलगामला येत होते. यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खड्ड्यात पडली. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की, जखमी जवानांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बचाव मोहीम सुरू करण्यात आली.
अनंतनागचे उपायुक्त डॉ. पियुष सिंगला यांनी माध्यमांना सांगितले की, जखमी जवानांवर जीएमसी अनंतनाग, जिल्हा रुग्णालय अनंतनाग आणि एसडीएच सर येथे उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच 19 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या.
गंभीर जखमी जवानांवर श्रीनगरमध्ये उपचार
आयटीबीपीचे डीजी एसएल थोसेन यांनी सांगितले की, या दुर्घटनेत सात जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे. आठ गंभीर जखमी जवानांना उपचारांसाठी श्रीनगरला नेण्यात आले आहे. उर्वरितांवर अनंतनाग येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, जम्मू-काश्मीरचे डीआयजी रणबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर जखमी जवानांना श्रीनगरच्या 92 बेस हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहे. उर्वरित जवानांची प्रकृती स्थिर आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App