अमोल काळे प्रकट झाले, संजय राऊत यांच्यावर बदनामीप्रकरणी करणार कायदेशिर कारवाई

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकार काळातील महाआयटी घोटाळ्यासंदर्भात अमोल काळे यांचे नाव घेतले होते. ते परदेशात पळून गेल्याचेही बोलले जात होते. हेच अमोल काळे प्रकट झाले असून जे नेते माझी बदनामी करत आहेत, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.Amol Kale revealed that Sanjay Raut will be prosecuted for defamation

अमोल काळे यांनी म्हटले आहे की, मी खासगी व्यावसायिक असून मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस काही नेत्यांची माझ्या संदभार्तील वक्तव्य पाहण्यात आली. ही सर्व वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत.



 

महाराष्ट्र शासनाचे मी कोणतंही कंत्राट घेतलेले नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे तपशील प्राप्तीकर विवरणात दिले आहेत. फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतूपुरस्सर बदनामी केली जात आहे. जे नेते माझी बदनामी करत आहेत, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा झाला होता. या प्रकरणातील अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले होते. राऊत, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी

काळे परदेशात पळून गेल्याची शंका व्यक्त केली होती. काळेंचे देवेंद्र फडणवीसांशी कनेक्शन काय आहे असा सवालही या निमित्ताने केला जात होता. अमोल काळे यांनी स्वत: मीडियाला निवेदन देऊन सर्व आरोपांचं खंडन केलं आहे.

अमोल काळे हे ४३ वषार्चे आहेत. ते नागपूरचे रहिवासी आहेत. नागपूरच्या अभ्यंकर नगरात त्यांचे दोन टोलेजंग बंगले आहेत. ते कन्स्ट्रक्शन आणि आयटी विभागाशी संबंधित व्यवसायात आहेत. तसेच तिरुमला तिरुपती समितीवर ते विशेष निमंत्रित सदस्य आहेत.

अमोल काळे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. काळे हे फडणवीसांचे बालपणापासूनचे मित्रं आहेत. फडणवीस हे शनीचे भक्त आहेत. त्यामुळे ते नेहमी शनी देवाच्या दर्शनासाठी शनी शिंगणापूरला जात असतात. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर टाईम्स ऑफ इंडियात फडणवीसांच्या शनिभक्तीवर बातमी आली होती.

त्यात अमोल काळे यांनी फडणवीसांच्या शनि भक्तीचा किस्सा सांगितला होता. फडणवीस आम्हाला नेहमी शनिशिंगणापूरला घेऊन जायचे. तासाभरात जाऊन येऊ असं सांगून ते आम्हाला न्यायचे, असं काळे यांनी म्हटले आहे.

Amol Kale revealed that Sanjay Raut will be prosecuted for defamation

महत्त्वाच्या बातम्या

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात