विशेष प्रतिनिधी
मुंबई : हे तीन पक्षांचं सरकार आहे. यांच्यात ताळमेळ नाहीये. हे एकमेकांच्या पायात पाय घालून पडणारं सरकार आहे. अमर,अकबर,अँथनी यांची तीन दिशेला तीन तोंडं आहेत. हे सरकार आपापसांतच भांडून पडेल. आम्हाला हे सरकार पाडण्यासाठी काही करण्याची गरजच नाही, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.Amar, Akbar, Anthony’s three faces in three directions,criticism of Raosaheb Danve
दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनी अशी उपमा दिली आहे. ते म्हणाले, सिनेमा कितीही खराब असला आणि एकदा तिकीट काढलं, तर माणसांना पूर्ण वेळ बसावंच लागतं. पण कधीकधी प्रेक्षकांमध्ये प्रक्षोभ झाला, तर अनेक चित्रपट बंद पडताना पाहिलेत. आम्ही त्यांच्या चांगल्या कामांना पाठिंबा देऊ, वाईट कामांना विरोध करू,
बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे सांगताना दानवे म्हणाले, मला उद्धवजींनी ८ दिवसांपूर्वी फोन केला. माझे दोनदा बोलणे झाले आहे. मी त्यांना भेटायला जाणार आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनसाठी त्यांना भेटणार आहे. कदाचित या प्रकल्पासाठी त्यांची मनस्थिती झाली असावी. पण बोलल्यानंतर मला कळेल. आमचं भेटायचं ठरलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App