महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अकोल्यातील बार्शीटाकळीच्या निवडक नगरसेवकांचा विरोध

bawankule and patole

जाणून घ्या विरोध दर्शवणारे नगरसेवक  कोण आहेत  आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी काय म्हटलं आहे?

विशेष प्रतिनिधी

अकोला : जिल्ह्यातील बार्शीटाकळी नगरपंचायतच्या सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. परंतु नगरपंचायतमधील काही नगरसेवकांनी तीव्र विरोध करीत मंजूर ठराव नामंजूर करण्याची मागणी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी, नगरपंचायत यांच्याकडे केली. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला आहे. Akola BJP targets Congress over corporators opposing the resolution to erect a statue of Chhatrapati Shivaji

‘’राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस नगरसेवकांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारवाई करतील का?’’ असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारला आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीट केले असून त्यासोबत संबंधित नगरसेवकांनी स्वत:चे नाव व स्वाक्षरीनिशी बार्शी टाकळीच्या नगराध्यक्षांना पाठवलेले पत्रही जोडले आहे.

शिवरायांच्या पुतळ्याच्या ठरावास विरोध दर्शवणारे नगरसेवक  –

नसीम खान अमजद खान, शबनम शाह, नुसरत जमील, इफ्तेखारीद्दीन काजी, अरशद उल्ला खान अन्सार उल्ला खान, हसन शाह अन्वर शाह, साबिया परविन सय्यद अबरार, अब्दुल अकील अब्दुल अजीज, लायका खातुन सरफराज खान.

Akola BJP targets Congress over corporators opposing the resolution to erect a statue of Chhatrapati Shivaji

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात