विशेष प्रतिनिधी
नागपूर : एकीकडे महाविकास आघाडी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत असताना विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार शिंदे – फडणवीसांच्या सरकारी विमानातून भरारी घेणार आहेत. बुधवारी दुपारी 1.00 च्या सुमारास ते सरकारी विमानाने नागपूरहून मुंबईला रवाना होतील. Ajit Pawar to travel Mumbai by government flight, courtesy Shinde – Fadanavis
अंतर्गत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांना तातडीने मुंबईत बोलावून घेतले असून पवारांच्या भेटीसाठी अजित दादा सरकारी विमानाने तातडीने नागपूर – मुंबई प्रवास करत आहेत. नागपूर – मुंबई विमानांची तिकिटे जवळपास फुल्ल झाली आहेत. त्यामुळे पवार यांनी आपले ‘राजकीय’ मित्र देवेंद्र फडणवीस यांना साद घातली आणि फडणवीस यांनी त्यांना लगेच प्रतिसाद दिला, अशी चर्चा आहे.
मंगळवारी सायंकाळी अजित पवार आणि फडणवीसांमध्ये त्यांच्या दालनात चर्चा झाली. त्यानंतर फडणवीसांनी त्यांच्यासाठी सरकारी विमान उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. आता या सरकारी विमानाने अजितदादा बुधवारी दुपारी 1.00 वाजता नागपूरहून मुंबईला रवाना होतील.
कारण काय?
तातडीच्या कारणास्तव अजित पवार मुंबईला जात असल्याचे विरोधीपक्ष नेत्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.
मात्र, शरद पवार यांनी बोलावून घेतल्यामुळे ते मुंबईला जात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचे फ्लोअर मॅनेजमेंट असफल ठरले आहे. शरद पवारांच्या इच्छेनुसार ते होत नाही. जयंत पाटील यांचे निलंबन, अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचे राजीनामा अशा अनेक मुद्द्यावर विरोधक सुरुवातीला आक्रमक झाले, पण काही तासांत त्यांची भूमिका मवाळ झाली. त्यामुळे शरद पवार नाराज असून, पुढच्या कामकाजाची रणनीती ठरवण्यासाठी त्यांनी अजित पवार यांना बोलावून घेतल्याचे समजते.
पण अजित पवार थेट सिल्वर ओकवर न जाता तुरुंगातून सुटलेल्या अनिल देशमुख यांच्या वरळीतील घरी जातील. तेथे दोन्ही पवारांची भेट होईल, असे समजते. देशमुख यांच्या शेजारच्या इमारतीत अजित पवार यांचे घर आहे. त्यामुळे तेथे ही भेट होऊ शकणार असल्याचे सांगितले जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App