राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगावात राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला सोमवारी हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून विशेष आवाहन केले आहे. अजित पवार म्हणाले की, सरकार तुमचेच आहे, पण सरकारला लुटू नका. Ajit Pawar advice to farmers – Government is yours but dont rob; An appeal to ST workers to end the strike
प्रतिनिधी
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील माळेगावात राजहंस संकुल संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याला सोमवारी हजेरी लावली. याप्रसंगी त्यांनी शेतकऱ्यांना उद्देशून विशेष आवाहन केले आहे. अजित पवार म्हणाले की, सरकार तुमचेच आहे, पण सरकारला लुटू नका.
वास्तविक, रस्ता रुंदीकरणाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांनी हे वरील भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, रुंदीकरणात लोकांनी रस्त्याच्या बाजूला झाडे लावलेली आहेत. जमिनीचा जो भाग रुंदीकरणात जातोच तेथेच लोकांनी झाडे लावलेली आहेत. दुसऱ्या बाजूला ती नाहीत. यावर प्रांतधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी आंबा, नारळाची झाडे लावल्यावर जास्त पैसे मिळत असल्याने लोकं ती झाडे लावत असल्याचं सांगितले. त्यावर अजित पवारांनी हे सरकार तुमचेच आहे. पण सरकारला लुटू नका, असं आवाहन केलं.
आपल्या भाषणादरम्यान पवारांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना आता पाच ते सात हजारांच्या आसपास पगारवाढ दिली आहे. त्यांची विलीनीकरणाच्या मागणीवर राज्य सरकारने समितीही नेमली आहे. एसटी कर्मचारीही आपलेच आहेत. पण, हे असंच (विलीनीकरण) करा असं सांगता येत नाही. एसटी सुरू करावी, असे आवाहन अजित पवारांनी केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App