वरळी सिलेंडर स्फोट दुर्घटनेतील अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार ; महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहिती


दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.Shiv Sena to take responsibility for orphan boy in Worli cylinder blast accident; Information given by Mayor Kishori Pednekar


विशेष प्रतिनिधी

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस वरळीत गणपतराव जाधव मार्गावर स्थित कामगार वसाहतीत बीडीडी चाळीतील सिलेंडर स्फोटात जखमी झालेल्या महिलेचाही आज कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. या दुर्घटनेत आतापर्यंत चार महिन्याच्या बालकासह माता-पित्यांचाही मृत्यू झाला आहे.

दरम्यान या कुटुंबातील विष्णू पुरी पाच वर्षीय मुलावर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान या अनाथ मुलाची जबाबदारी शिवसेना घेणार असल्याच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.



पेडणेकर म्हणाल्या की, ५ वर्षाचे अनाथ मुलाला वाचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत .मूल वाचल्यास आम्ही त्या मुलाला दत्तक घेऊन त्याच पालकत्व आम्हीच स्विकारणार आहोत. तसेच मुलाची प्रकृती सध्या ठिक आहे. पुढे किशोरी पेडणेकर विरोधकांना उत्तर देताना म्हणाल्या की,’संवेदना बोंब मारून येणार नाहीत, तर त्या ह्रद्यातून याव्या लागतात’.

तसेच दुर्घटना घडलेला परिसर हा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील आहे. यामुळे आदित्य ठाकरेंवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे.दरम्यान या टीकेला उत्तर देताना महापौर म्हणाल्या की, “ब्लास्ट झाल्यावर सेनेचे कार्यकर्ते पोहचले होते. उपचाराकरता त्यांना तात्काळ रूग्णालयातही नेण्यात आले.”

Shiv Sena to take responsibility for orphan boy in Worli cylinder blast accident; Information given by Mayor Kishori Pednekar

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात