Agriculture Minister Dadaji Bhuse : कृषिमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नातच कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. लग्नात 25 पेक्षा जास्त वऱ्हाडी असून नयेत, तसेच लग्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ सुरू राहू नये असाही नियम आहे. यामुळे परंतु मालेगाव येथे झालेल्या लग्न सोहळ्यात या नियमांना हरताळ फासण्याचं काम खुद्द सरकारमधील मंत्री आणि खासदारांनी केलं आहे. ‘झी 24 तास’ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. यानुसार कृषिमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र व ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या कन्येचा विवाह मालेगाव येथील आनंद फार्महाऊसवर पार पडला. हा विवाह सोहळा पाच तासांहून अधिक सुरू होता. Agriculture Minister Dadaji Bhuse Son Married to MP Rajan Vichares daughter in Malegaon, allegations of violating Corona rules
विशेष प्रतिनिधी
मनमाड : कृषिमंत्र्यांच्या मुलाच्या लग्नातच कोरोना नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. लग्नात 25 पेक्षा जास्त वऱ्हाडी असून नयेत, तसेच लग्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ सुरू राहू नये असाही नियम आहे. यामुळे परंतु मालेगाव येथे झालेल्या लग्न सोहळ्यात या नियमांना हरताळ फासण्याचं काम खुद्द सरकारमधील मंत्री आणि खासदारांनी केलं आहे. ‘झी 24 तास’ने याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. यानुसार कृषिमंत्री दादा भुसे यांचे सुपुत्र व ठाण्याचे शिवसेना खासदार राजन विचारे यांच्या कन्येचा विवाह मालेगाव येथील आनंद फार्महाऊसवर पार पडला. हा विवाह सोहळा पाच तासांहून अधिक सुरू होता.
कोरोना नियमावलीला सत्ताधाऱ्यांकडूनच हरताळ!
‘झी 24 तास’ने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वसामान्यांना कडक असलेल्या कोरोना नियमावलीचा या दोन्ही जबाबदार नेत्यांना विसर पडल्याचे दिसून आले. विवाह सोहळ्याची अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. नातेवाइकांव्यतिरिक्त तेथे कुणालाही प्रवेश नव्हता. या लग्न सोहळ्याला मंत्री एकनाथ शिंदेही हजर होते. सकाळी नऊपासून ते दुपारी दोनपर्यंत हा विवाह सोहळा सुरू होता. लग्न सोहळ्या व्हीआयपी व्यक्तींनाच फक्त प्रवेश होता असेही सांगण्यात येत आहे.
फक्त व्हीआयपींनाच होता प्रवेश
दुसरीकडे, ‘टीव्ही 9 ने’ दिलेल्या वृत्तानुसार, ज्या फार्म हाऊसवर हा विवाह सोहळा झाला, त्या फार्म हाऊसच्या गेटवर परवानगीशिवाय आत येऊ नये असा फलक लावण्यात आला होता. या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र विशेष अतिथी आणि त्यांच्या वाहनांना परवानगी देण्यात आली होती. राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. पोलीस आणि सुरक्षा पथकांचा मात्र या ठिकाणी राबता पाहायला मिळाला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला. तर अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला.
काळ्या कापडाने झाकले फॉर्म हाऊसचे कंपाउंड?
तर ‘न्यूज 18 लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या फार्म हाऊसवर हा लग्न सोहळा संपन्न झाला त्या फार्म हाऊसच्या वाल कंपाउंडला देखील काळ्या कापडाने झाकण्यात आले होते. तर, गेटपासून सुमारे एक किमी अंतरावर फार्म हाऊसमध्ये काय चालत आहे, याचा थांगपत्ता लागत नसल्याने विवाह सोहळ्यास किती लोकं उपस्थित होते? त्यांनी मास्क घातले होते की नाही? सोशल डिस्टन्सचे पालन झाले की नाही? आलेल्या पाहुणे मंडळींच्या आरोग्य तपासणीची काय होती व्यवस्था? या विवाह सोहळ्याला परवानगी होती आण जर होती तर शासनाने घालून दिलेली बंधनं पाळली का?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.
Agriculture Minister Dadaji Bhuse Son Married to MP Rajan Vichares daughter in Malegaon, allegations of violating Corona rules
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App