महागाई विराेधात भाष्य न करता भाजपचे नेते लपून बसले – बाळासाहेब थाेरात

सन २०१४ मध्ये नरेंद्र माेदी सरकार केंद्रात सत्तेत आले आणि तेव्हापासून महागाई वाढत गेल्याचे दिसून येते.पेट्राेल, डिझेल, गॅसचे दर माेठया प्रमाणात वाढले असल्याने जीवनावश्यक वस्तूचे दर वाढून त्याचा त्रास नागरिकांना हाेत आहे असे मत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले आहे. After Increasing prices of gas, petrol, diesel BJP leaders not shown anywhere says minister Balasaheb Thorat


विशेष प्रतिनिधी

पुणे : सन २०१४ मध्ये नरेंद्र माेदी सरकार केंद्रात सत्तेत आले आणि तेव्हापासून महागाई वाढत गेल्याचे दिसून येते.पेट्राेल, डिझेल, गॅसचे दर माेठया प्रमाणात वाढले असल्याने जीवनावश्यक वस्तूचे दर वाढून त्याचा त्रास नागरिकांना हाेत आहे. भाजपचे लाेक जे रस्त्यावर आदाेलन करण्यासाठी येत असत आज ते लपून बसलेले दिसून येतात. त्यांनी बाहेर येऊन महागाई कमी करु याबाबत भाष्य केले पाहिजे असा टाेला महसूलमंत्री बाळासाहेब थाेरात यांनी शुक्रवारी लगावला आहे.

जीवनावश्यक वस्तू व  इंधन दरवाढी विराेधात काँग्रेस पक्षातर्फे अलका टाॅकीज चाैकात आदाेलन करण्यात आले त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी मंत्री रमेश बागवे, आमदार संग्राम थाेपटे, आमदार दिप्ती चवधरी, माजी आमदार माेन जाेशी, प्रवक्ते गाेपाळ तिवारी, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अभय छाजेड उपस्थित हाेते.



थाेरात म्हणाले, सरकार माेठया प्रमाणात पैसे जनतेच्या खिशातून काढत असून ते खर्च नेमके काेठे करत आहे हे समजत नाही. भाजप नेत्यांना वाढत्या महागाई विराेधात जनतेने जाब विचारला पाहिजे आणि महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. देशभरात माेदी सरकारचा निषेध केला जात असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे ही वेळ येऊन ठेपलेली आहे. जनतेतून असंताेष भावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही.

पुढे ते म्हणाले, भाजपने सत्तेवर येताना अच्छे दिनचे स्वप्न दाखवले परंतु महागाईचा दर माेठया प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. गाेरगरीब, मध्यमवर्गीय जनता यामुळे हवालदिल झालेली आहे. सर्वसामान्य नागरिकांना किफायतशीर घरे मिळाली पाहिजे रेडीरेकनरचा दर शहरात वाढला त्याकरिता वर्षभर यंत्रणा काम करते. सन २०१५ मध्ये १५ टक्क्यांनी रेडीरेकनर दर वाढवले गेले त्यानंतर पाच वर्ष अभ्यास करुन रेडीरेकनरचे दर वाढविण्यात आले आहे. २७ लाखांच्या खरेदीखताचा अभ्यास करुन रेडीरेकनर दर वाढले गेले. महाविकास आघाडी सरकारने वाईन काेणते प्राधान्य दिलेले नाही.

काँग्रेसमध्ये काेणी नाराज नाही

बाळासाहेब थाेरात म्हणाले, पाच व सहा एप्रिल राेजी दिल्लीत एक प्रशिक्षण शिबीर आहे त्याकरिता राज्यातील काँग्रेसचे आमदार जाणार आहे. सहाजिकपणे ते नेतृत्वाला भेटणार असून त्यादृष्टीने ते पक्ष नेतृत्वाला भेटण्यासाठी त्यांनी लेखी पत्र दिले आहे. परंतु दिशाभूल करणारा प्रचार काेठून सुरु झाला माहिती नाही. काेणत्याही आमदाराची नाराजी सरकारमध्ये नाही. जाणीवपूर्वक काेणतरी विर्पायस करत असल्याचे दिसून येते. युपीएच्या अध्यक्षपदाबाबत चर्चा सुरु परंतु देशभरात पसरलेला काँग्रेस असून तेच नेतृत्व करणार आहे.ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचे वक्तव्याचा ही विर्पयास करण्यात येत असल्याचे जाणवत आहे.

After Increasing prices of gas, petrol, diesel BJP leaders not shown anywhere says minister Balasaheb Thorat

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात