पतीच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पुस्तकातील लेख शेअर करून व्यक्त केल्या आपल्या भावना, म्हणाली काय घडले, पुढे काय घडणार, याबद्दल विचार करत बसण्याऐवजी वास्तवात जगायला शिकले पाहिजे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : काय घडले, पुढे काय घडणार, याबद्दल विचार करत बसण्याऐवजी वास्तवात जगायला शिकले पाहिजे, अशा आशयाचा लेख इन्स्टाग्रामवर शेअर करून अभिनेत्री आणि अश्लिल चित्रपट बनविल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टी हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.After her husband’s arrest, Shilpa Shetty shared her feelings in the book and said that instead of thinking about what happened,

राज कुंद्रा याला अश्लील चित्रफिती बनवल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्यानंतर शिल्पा शेट्टी अज्ञातवासात गेली होती. तिने या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती. आज पहिल्यांदाच ती सोशल मीडियाद्वारे समोर आली आहे.



मात्र, तिने स्वत:ची काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. आपल्या इन्स्टाग्रामवरून लेखक जेम्स थर्बर यांच्या पुस्तकातील एका लेखाचा फोटो शेअर केला. या लेखात म्हटले आहे की, रागाच्या भरात मागे वळू नका किंवा घाबरून पुढेही पाहू नका.

जागरूक होऊन फक्त सभोवताली बघत राहा. आपण रागात त्या लोकांना मागे पाहतो ज्यांनी आपल्याला सर्वांत जास्त दु:ख दिलेले असते. नोकरी तर जाणार नाही ना, या भीतीने आपण घाबरतच पुढे पाहत असतो.

आपल्याला वाटणारी भीती ही जवळच्या लोकांना गमावण्याची किंवा आजारपणाचीही असू शकते. आपण वर्तमानामध्ये जगायला शिकले पाहिजे. काय घडले, पुढे काय घडणार, याबद्दल विचार करत बसण्याऐवजी वास्तवात जगायला शिकले पाहिजे.

योगा करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या शिल्पा शेट्टी हिने शेअर केलेल्या लेखात म्हटले आहे की, मी जिवंत असल्याबद्दल स्वत:ला भाग्यवान समजून एक दीर्घ श्वास घेते आणि विचार करते की, मी भाग्यवान असल्यामुळेच हे आयुष्य जगण्याची संधी मला मिळाली.

मी भूतकाळामध्ये अनेक आव्हानांना सामोरी गेलेली आहे. भविष्यातील आव्हानांनाही सामोरे जाणार आहे. माझ्या इच्छेनुसार आयुष्य जगण्यापासून मला कोणीही अडवू शकत नाही.शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याला अश्लिल चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला अश्लिल चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले. राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात.

त्यांची यूके स्थित केनरिन प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे.

राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लिल चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

दरम्यान, शिल्पा शेट्टी हिचीही जुहू इथल्या घरात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून ही चौकशी केल्याची चर्चा आहे. गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या घरावर छापा टाकला आणि यावेळी त्यांना त्यच्या घरात सर्व्हर आणि 90 व्हिडीओ सापडले. ते हॉटशॉटसाठी बनवले गेले होते.

After her husband’s arrest, Shilpa Shetty shared her feelings in the book and said that instead of thinking about what happened,

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात