विशेष प्रतिनिधी
अकोला : अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर नुकतीच चार दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आता अकोला जिल्ह्यातील अकोटमध्येही हाच निर्णय घेण्यात आला आहे. अकोटमध्ये 24 तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला.
त्रिपुरातील कथित हिंसक घटनेचे राज्यात अनेक भागांत हिंसक पडसाद उमटले. अमरावती, नांदेड, परभणी, भिवंडी, मालेगावमध्ये या घटनेचे हिंसाचार झाला. अमरावतीत सलग दुसऱ्या दिवशी हिंसाचार सुरू होता. त्यामुळे अमरावतीत कालच चार दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हे भाग वगळता राज्यात सर्वत्र शांतता होती.
अकोला जिल्ह्यातही सर्वत्र शांतता असतानाच अकोटमध्येही दगडफेक घडली. काल अकोट शहरातील हनुमान नगर आणि नवगाजी प्लॉट येथे दुपारच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती. त्याची गंभीर दखल घेऊन अकोट उपविभागीय अधिकाऱ्यांनी अकोटमध्ये 13 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजल्यापासून ते 14 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीच्या कालावधीत आरोग्य सेवा वगळता सर्व सेवा बंद राहणार आहेत. तसेच कुणालाही या कालावधीत बाहेर फिरता येणार नाही. शिवाय पाचपेक्षा अधिक लोकं एकत्रं आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
अमरावतीमध्ये काल पुकारलेल्या बंदमदरम्यान भाजपचे नेतेही सहभागी झाले होते. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे हेसुद्धा या बंदमध्ये सहभागी होते. पोलिसांकडून भाजपच्या या नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. भाजपच्या महिला अध्यक्ष निवेदिता चौधरी तसेच भाजपचे माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App