शरद पवार आजही भाजप बरोबर; ठाकरेंशी युती केल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या टार्गेटवर पुन्हा पवार!!


प्रतिनिधी

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली खरी, पण उद्धव ठाकरे हे आजही ज्या महाविकास आघाडीत आहेत, त्याचे नेते असलेल्या शरद पवारांना मात्र आंबेडकरांनी टार्गेटवरच ठेवले आहे. शरद पवार आजही भाजप बरोबरच आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे.
After alliance with Thackeray, Pawar again targets Prakash Ambedkar

2019 पासूनच्या राजकारणाचा आढावा घेताना प्रकाश आंबेडकरांनी विरोधी पक्ष नेते अजितदादा पवारांच्या एका मुलाखतीचा हवाला दिला आहे. त्या मुलाखतीत अजितदादा म्हणाले होते, भाजप बरोबर जायचे हे पक्षाचे ठरले होते. मी फक्त आधी गेलो आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सरकार स्थापन केले. त्यामुळेच मी म्हणतोय पवारांचे भाजप बरोबर सूत जुळलेच होते आणि आजही ते भाजपबरोबरच आहेत, असा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला.


शरद पवारांच्या वाढदिवसाच्या भाषणात पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, चंद्रकांतदादा टार्गेटवर!


मात्र शरद पवारांनी विरोधी एकजुटीचा प्रयत्न केल्याचे प्रकाश आंबेडकरांच्या निदर्शनाला आणून देताच ते म्हणाले, की विरोधी ऐक्याचा प्रयत्न तर केसीआर चंद्रशेखर राव यांनी पण केला होता. पण त्यात शरद पवार नव्हते, याकडे प्रकाश आंबेडकरांनी लक्ष वेधले आहे. शरद पवार यांच्याशी जुने मतभेद आहेत. पण हे जुने मतभेद विसरून पवार शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर येतील, असा दावाही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांची दुहेरी रणनीती

प्रकाश आंबेडकर हे एकाच वेळी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर युती आणि शरद पवारांबरोबर राजकीय पंगा अशी दुहेरी रणनीती आजमावत आहेत. जुने भांडण विसरून शरद पवारांनी आपल्याबरोबर यावे असे आवाहन ते जरूर करत आहेत, पण त्याच वेळी वारंवार वेगवेगळ्या मुद्द्यांवर पवारांना टार्गेट करायचे देखील ते सोडत नाहीत.

शरद पवारांनी वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांची युती होण्याच्या दिवशी सकाळी 23 जानेवारीला मला त्यांच्या युती संदर्भात काही माहिती नाही आणि मी त्या भानगडीत पडत नाही, असे बारामतीत सांगून आंबेडकरांचा विषय झटकून टाकला होता. वंचित शिवसेना युतीच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांना तो प्रश्न देखील विचारला होता. त्यावेळी देखील प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबरोबरचे भांडण हे शेतजमिनीच्या बांधाचे नाही तर तत्त्वाचे आहे, असे सांगितले होते. पण तेव्हाही त्यांनी शरद पवार जुने भांडण विसरून आमच्याबरोबर येतील,असा दावा केला होता.

आता दोन दिवसांनी 25 जानेवारी रोजी प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा शरद पवारांनाच टार्गेट केले आहे. दोन दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर भाजपबरोबर गेल्याचा आरोप केला नव्हता. तो आज केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंबरोबर युती आणि शरद पवार टार्गेट अशी ही दुहेरी रणनीती प्रकाश आंबेडकरांनी आजमावली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीत एकजूट राखणारी ठरणार की फूट पाडणारी ठरणार हे भविष्यकाळात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

After alliance with Thackeray, Pawar again targets Prakash Ambedkar

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण