शरद पवारांच्या वाढदिवसाच्या भाषणात पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल, चंद्रकांतदादा टार्गेटवर!


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज १२ डिसेंबर 2022 रोजी आपल्या वाढदिवसाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याच वेळी त्यांनी महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही टार्गेटवर घेतले आहे. आपल्या संपूर्ण भाषणात शरद पवारांनी तीन प्रमुख मुद्देच उपस्थित केले. यामध्ये नरेंद्र मोदी यांच्यावरची टीका, चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरची टीका आणि समृद्धी महामार्गाला राष्ट्रवादी काँग्रेसने न केलेला विरोध हे ते मुद्दे होते. Sharad Pawar’s birthday speech will attack Prime Minister Modi

शरद पवार यांनी आज वयाची 82 वर्षे पूर्ण करून 83 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रव्यापी महाराष्ट्राचा सह्याद्री असा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी खासदार आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे मुख्य भाषण झाले. मात्र, त्यानंतर सत्काराला उत्तर देताना शरद पवारांनी आपल्या छोटेखानी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवार म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन आणि मेट्रोच्या उद्घाटन या सरकारी कार्यक्रमांमधून सर्व विरोधी पक्षांवर टीका केली आहे. पक्षीय व्यासपीठावरून नरेंद्र मोदी यांनी कोणतीही टीका केली, तर तो त्यांचा अधिकार आहे. परंतु, सरकारी कार्यक्रमांमध्ये मोदींनी विरोधकांवर टीका करणे योग्य नाही. आत्तापर्यंत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून अनेक पंतप्रधानांची भाषणे मी ऐकली. त्यांनी सरकारी कार्यक्रमांमधून कधीही विरोधकांवर टीका केलेली मी ऐकली नाही. पण मोदींनी मात्र सरकारी कार्यक्रमात विरोधकांना लक्ष्य केले आहे. हे लोकशाहीचे लक्षण नाही.



त्याचवेळी चंद्रकांत दादा पाटील या प्रकरणावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, की त्यांच्यावर झालेल्या शाईफेकीचे मी समर्थन करत नाही. पण त्यांनी महापुरुषांबद्दल कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केले नसते तर हा प्रकार घडला नसता. महात्मा ज्योतिबा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात भीक शब्द वापरणे अजिबात योग्य नाही. त्यांनी आपले सर्व जीवन खपवून शिक्षण संस्था उभारल्या. त्यामुळे त्यांच्याबद्दल आदरपूर्वकच बोलले पाहिजे. परंतु चंद्रकांतदादा पाटलांनी भीक शब्द वापरल्याने वाद तयार झाला. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या रयत शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्यच मूळात कमवा आणि शिका, असे आहे, याकडे शरद पवारांनी लक्ष घेतले.

त्याच वेळी शरद पवारांनी समृद्धी महामार्ग संदर्भात काही खुलासा केला. समृद्धी महामार्गाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केल्याच्या बातम्या आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही आरोप केलेले मी वाचले. परंतु समृद्धी महामार्गाला राष्ट्रवादीने कधीही विरोध केला नाही. ज्यांच्या जमिनी महामार्गासाठी घेतल्या गेल्या ते शेतकरी मला त्यावेळी मराठवाडा दौऱ्यात भेटले आणि त्यांनी आपल्या शेतजमिनीचा रास्ता मोबदला मिळत नाही, अशी तक्रार केली होती. त्यावरून त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना मी फक्त शेतकऱ्यांना रास्त भाव द्या एवढेच सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने समृद्धी महामार्गाला विरोध केला नाही, असा दावा शरद पवारांनी केला.

आपले 83 व्या वाढदिवसाच्या शरद पवारांनी आपल्या भाषणाचा संपूर्ण रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नागपुरात केलेल्या भाषणावर आणि चंद्रकांतदादा पाटलांवर ठेवला. मोदींनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अथवा काँग्रेस या पक्षांचा साधा उल्लेखही केला नव्हता. त्यांनी फक्त शॉर्टकट राजकारणाचा विरोधकांना उपयोग होणार नाही, असे म्हटले होते. एक प्रकारे मोदींनी नाव न घेता आम आदमी पार्टीला टार्गेट केले होते. परंतु महाराष्ट्रात येऊन मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस अथवा शिवसेनेचे नावही घेतले नाही. या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींच्या कालच्या भाषणाला टार्गेट केले आहे, हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे.

Sharad Pawar’s birthday speech will attack Prime Minister Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात