Maratha reservation agitation in kolhapur : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत. adv Prakash Ambedkar participating In Maratha reservation agitation in kolhapur with MP sambhajiraje chhatrapati
विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात, ऐतिहासिक राजर्षी शाहू महाराजांच्या समाधी स्थळी उद्या होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ ज्येष्ठ नेते अॅड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji — Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
उद्या दि. १६ जून रोजी कोल्हापुरात मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी खा. संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आयोजित मराठा आरक्षण मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर सहभागी होणार आहेत.@Prksh_Ambedkar @YuvrajSambhaji
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) June 15, 2021
छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे, त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.
ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय दिला. देशात सर्वात पहिल्यांदा आरक्षण लागू केले. बाबासाहेबांना सर्वार्थाने मदत केली ती शाहू महाराजांनी. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी शाहू महाराजांनी केलेल्या क्रांतिकारी कार्याचा गौरव केला आहे. अनेक अर्थांनी हा पाठिंबा अभूतपूर्व असणार आहे. महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशात हा सामाजिक समतेचा आणि एकोप्याचा संदेश जाईल, अशा भावना वंचित बहुजन आघाडीतर्फे व्यक्त करण्यात आल्या आहेत.
adv Prakash Ambedkar participating In Maratha reservation agitation in kolhapur with MP sambhajiraje chhatrapati
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App