स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षानिमित्त दुबईच्या वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारताकडून अंतराळ शक्तीचे प्रदर्शन, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai

भारत पुढील वर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून अंतराळ तंत्रज्ञानासह 11 थीम्सवर प्रदर्शन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. माहिती देताना जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारत आपली अंतराळ शक्ती दाखवेल. union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत पुढील वर्षी ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत दुबईमध्ये होणाऱ्या जागतिक एक्स्पोमध्ये सहभागी होणार असून अंतराळ तंत्रज्ञानासह 11 थीम्सवर प्रदर्शन करणार आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोमवारी ही माहिती दिली. माहिती देताना जितेंद्र सिंह म्हणाले की, वर्ल्ड एक्स्पोमध्ये भारत आपली अंतराळ शक्ती दाखवेल.

वर्ल्ड एक्स्पोमध्ये दिसेल भारताची अंतराळातील ताकद

पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अवकाश विज्ञान, फार्मा, रत्ने व दागदागिने, स्टार्ट-अप्स, खाद्य प्रक्रिया आणि ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती यासारख्या क्षेत्रात जगासमोर आपली नेतृत्वासंबंधी भूमिका भारत सादर करेल.

192 देशांचा सहभाग

1 ऑक्टोबर 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत वर्ल्ड एक्स्पो आयोजित केला जाईल. ज्यामध्ये किमान 192 देश सहभागी होतील. महत्त्वाचे म्हणजे 2022 मध्ये भारत आपल्या स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिनही साजरा करणार आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या सदस्यांनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना दुबईमध्ये आयोजित होणाऱ्या वर्ल्ड एक्स्पोबद्दल माहिती दिली आहे.

वर्ल्ड एक्स्पोदरम्यान इस्रोच्या कर्तृत्वाचे प्रदर्शन करण्यासाठी येथे एक विशेष प्लॉट बुक करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान भारत दुबईमधील अंतराळ संशोधनाशिवाय 11 थीम्सवर प्रदर्शन आयोजित करण्यात येईल.

union minister jitendra singh says india will showcase space power at world expo in dubai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात