कंगनाच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, पासपोर्ट रिन्युअलची विनंती, असे आहे प्रकरण

Bollywood Actress Kangana ranaut passport renewal case hearing in bombay high court

Kangana Ranaut Passport Renewal Case : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. वस्तुतः पासपोर्ट प्राधिकरणाने अलीकडेच कंगनाच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. या प्रकरणात कंगना रनौतने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंगनाने पासपोर्ट नूतनीकरणासाठी कोर्टात अपील केले आहे. Bollywood Actress Kangana ranaut passport renewal case hearing in bombay high court


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या पासपोर्ट नूतनीकरण प्रकरणाची सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे. वस्तुतः पासपोर्ट प्राधिकरणाने अलीकडेच कंगनाच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. या प्रकरणात कंगना रनौतने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कंगनाने पासपोर्ट नूतनीकरणासाठी कोर्टात अपील केले आहे.

मुंबईच्या वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये अभिनेत्रीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने त्याच वस्तुस्थितीचा संदर्भ देऊन तिचे पासपोर्ट नूतनीकरण करण्यास नकार दिला होता. त्यानंतर कंगनाला उच्च न्यायालयात जाणे भाग पडले. कंगनाने पासपोर्ट नूतनीकरणासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे.

कंगनावर द्वेष पसरवल्याचा आरोप

सोशल मीडियावर द्वेष पसरवल्याबद्दल वांद्रे पोलीस ठाण्यात कंगना आणि तिची बहीण रंगोलीविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापूर्वी कंगनाने एफआयआर नोंदवण्यासाठी न्यायालयात याचिकादेखील दाखल केली होती. कोर्टात कंगनाने असेही म्हटले होते की, तिच्या कोणत्याही ट्विटने कोणत्याही प्रकारचा हिंसाचार केला नाही किंवा कोणतेही गुन्हेगारी कृत्य केले गेले नाही.

कंगनाच्या ट्वीटमुळे अनेकदा वाद

कंगना रनौत सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. वेगवेगळ्या मुद्द्यांवरील ती बिनधास्त आपले मत व्यक्त करते. अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर कंगनाने महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. याशिवाय तिने शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक ट्विट केले आहेत. यामुळे मोठा वाद सुरू झाला होता.

Bollywood Actress Kangana ranaut passport renewal case hearing in bombay high court

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात