COVID Vaccine For Children : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सहा महिन्यांत मुलांसाठी कोरोनावरील लस बाजारात आणण्याची योजना आखत आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, ‘कोव्हॉवॅक्स’ची चाचणी सध्या सुरू आहे. Adar Poonawalla Says Serum Institute To Launch COVID Vaccine For Children In Six Months
वृत्तसंस्था
पुणे : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) सहा महिन्यांत मुलांसाठी कोरोनावरील लस बाजारात आणण्याची योजना आखत आहे. कंपनीचे सीईओ अदार पूनावाला यांनी मंगळवारी ही घोषणा केली. ते म्हणाले की, ‘कोव्हॉवॅक्स’ची चाचणी सध्या सुरू आहे.
लस उद्योगाशी संबंधित एका परिषदेत भाग घेत पूनावाला म्हणाले की, लहान मुलांची लस ‘कोव्हॉवॅक्स’ तीन वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनापासून वाचवेल. सध्या, सीरमची ‘कोविशील्ड’ आणि इतर कंपन्यांची कोरोनाविरोधी लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तयार करण्यात आली आहे.
पूनावाला म्हणाले की, आम्हाला मुलांमध्ये गंभीर आजार दिसले नाहीत. सुदैवाने, मुलांबाबत घाबरण्यासारखी परिस्थिती नाही. मात्र, आम्ही येत्या सहा महिन्यांत मुलांसाठी लस आणू. आशा आहे की ती तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी असेल. ते म्हणाले की, देशात दोन कंपन्यांना लहान मुलांच्या लसीसाठी परवाना देण्यात आला असून त्यांची लस लवकरच उपलब्ध होईल.
पूनावाला म्हणाले की, तुम्ही मुलांचे लसीकरण करून घ्या, त्यात कोणतेही नुकसान नाही. या लसी सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. तुमच्या मुलाला लसीकरण करायचे असेल तर सरकारच्या घोषणेची वाट पाहा आणि त्यानंतर लस द्या, असे ते म्हणाले. कोव्होव्हॅक्सची सध्या चाचणी सुरू आहे आणि तीन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी चांगले परिणाम दाखवले आहेत. पूनावाला यांनी असेही सांगितले की, ही लस काम करेल आणि संसर्गजन्य रोगांपासून मुलांचे संरक्षण करेल, असा पुरेसा डेटा आहे.
सीरमचे सीईओ म्हणाले की, कोरोनाच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनचा मुलांवर काय परिणाम होईल याबद्दल काहीही सांगता येणार नाही. याचा त्यांच्यावर काय परिणाम होईल, हे मी आताच सांगू शकत नाही. होय, हे निश्चित आहे की कोरोना विषाणूचा आतापर्यंत मुलांवर फारसा परिणाम झालेला नाही. मला वाटते त्यांचे शरीर, पेशी आणि फुप्फुसे उत्तमरीतीने रिकव्हर करते.
Adar Poonawalla Says Serum Institute To Launch COVID Vaccine For Children In Six Months
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App