ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना प्रकृती बिघडल्यामुळे 29 जून रोजी खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नसीर यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. नुकताच त्यांच्या फुफ्फुसात एक पॅच आढळला होता, त्यानंतर नसीरुद्दीन यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या त्यांच्या मॅनेजरने हेल्थ अपडेट देताना सांगितले की, त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे. Actor naseeruddin shah hospitalised due to pneumonia in hinduja hospital
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांना प्रकृती बिघडल्यामुळे 29 जून रोजी खार येथील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नसीर यांना न्यूमोनियाची लागण झाली आहे. नुकताच त्यांच्या फुफ्फुसात एक पॅच आढळला होता, त्यानंतर नसीरुद्दीन यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या त्यांच्या मॅनेजरने हेल्थ अपडेट देताना सांगितले की, त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली आहे.
मॅनेजर म्हणाले की, ‘ते रुग्णालयात आहेत. येथे ते वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. न्यूमोनियाच्या त्रासानंतर त्यांना येथे आणण्यात आले. सध्या त्यांची तब्येत स्थिर असून सुधारत आहे. मंगळवारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर नसीरुद्दीन यांची प्रकृती आता ठीक आहे. एक-दोन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सुटी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
गतवर्षी अभिनेता इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्या निधनाच्या वेळी नसीरुद्दीन यांच्या तब्येतीबद्दल बरीच चर्चा झाली होती. पण नंतर त्यांचे सुपुत्र जीवन शहा यांनी आपल्या वडिलांच्या प्रकृतीबाबतच्या अफवांचे खंडन केले होते.
नसीरुद्दीन शाह (वय 70) रुग्णालयात दाखल झाले असून त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रत्न पाठक आणि मुलेही आहेत. नसीरुद्दीन यांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. यात मासूम, त्रिदेव, सरफरोश, मकबूल, इक्बाल, बनारस, परझानिया, इश्किया, द डर्टी पिक्चर, जॉन डे, बेगम जान यासह अनेक चित्रपटांचा समावेश आहे. अखेरचे ते झी5चा चित्रपट ‘रक्सम’मध्ये दिसले होते.
Actor naseeruddin shah hospitalised due to pneumonia in hinduja hospital
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App