वृत्तसंस्था
पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून फोन करणार्याने एकनाथ शिंदे यांना उडवून देऊ, असे सांगून कॉल डिस्कनेक्ट केला.Accused who made a death threat to Chief Minister Eknath Shinde arrested from Warje in Pune
महाराष्ट्र पोलिसांना नियंत्रण क्रमांक 112 वर कॉल आला होता. सोमवारी (10 एप्रिल) सायंकाळी उशिरा हा फोन आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवून देऊ, असे कॉलरने पोलिसांना सांगितले होते.
पोलिसांनी फोन करणाऱ्याला केली अटक
मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन आल्यानंतर पोलिस तत्काळ सक्रिय झाले आणि फोन करणाऱ्याचे लोकेशन ट्रेस केले. यानंतर पुणे पोलिसांनी फोन करणाऱ्याला अटक केली. फोन करणारा हा मुंबईतील धारावी भागातील रहिवासी आहे. त्याने दारूच्या नशेत फोन केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.
फोन करणाऱ्याला पुण्यातून अटक
राजेश आगवणे असे मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पुण्यातील वारजे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. राजेशच्या फोननंतर महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई क्राइम ब्रँचही त्याचा शोध घेत होते.
मुंबई क्राइम ब्रँचचे एक पथक रात्री त्याच्या धारावी येथील घरीही गेले मात्र तेथे तो सापडला नाही. पोलिसांना त्याचे पुण्यातील लोकेशन सापडले, त्यानंतर पुणे पोलिस आणि नागपूर एटीएसच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App