वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात कोरोना, ओमीक्रोनचा संसर्ग रोखण्यासाठी कठोर दंडात्मक कारवाईला आजपासून प्रारंभ होत आहे. मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड आणि मास्क नसताना सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १००० रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. A fine of Rs.500 for not wearing a mask, spitting on the street A fine of one thousand rupees; Strict measures in Pune to prevent corona infection
पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी ५ जानेवारी २०२२ पासून होत आहे”, असे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
दरम्यान, पुण्यात कोरोना रुग्ण वाढत चालले आहेत. सोमवारी दिवसभरात रुग्णसंख्या १ हजारांनी वाढली असल्याने दक्षतेच्या उपायांवर बैठकीत चर्चा झाली. त्यावेळी संक्रमण रोखले नाही तर भविष्यात ते रोखण्यासाठी दुप्पट काम करावे लागणार असून ते आवाक्याबाहेर गेले तर परिस्थिती नियंत्रणात आणणे अशक्य होईल, असा सूर बैठकीचा होता. त्यामुळे कठोर दंडात्मक उपाय लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App