पवार – अजितदादांच्या “गुप्त” बैठकीनंतर ठाकरे – नानांची मातोश्रीवर “उघड” बैठक; पवारांच्या विश्वासार्हतेवर ठळक प्रश्नचिन्ह!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यातल्या “गुप्त” बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल रात्री मातोश्रीवर उघड बैठक घेतली आणि पवारांच्या विश्वासार्हतेवर ठळक प्रश्नचिन्ह लावले!! A big question mark on Pawar’s credibility on sharad pawar

उद्योजक अतुल चोरडियांच्या घरी काका-पुतण्याच्या या “गुप्त” भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदनिष्ठ गटही सत्तेत सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवारांनी त्याचा सांगोला येथे इन्कार केला असला तरी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांच्या भूमिकेविषयी दाट संशय व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नाना पटोले यांनी शरद पवार-अजित पवार यांच्या भेटीवरून सूचक इशारा दिला. जनतेच्या मनात महाविकास आघाडीबाबत संभ्रम झालेले आम्ही सहन करणार नाही. पवारांनी हा संभ्रम दूर करावा, असा सूचक इशारा नाना पटोले यांनी दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे उघड झाले आहे.



उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर नाना पटोले म्हणाले, शरद पवार आणि अजित पवार यांच्या “गुप्त” भेटीबाबत जनतेच्या मनात संभ्रम आहे. असा संभ्रम पुन्हा होता कामा नये, याबाबत स्पष्टता यावी, अशी चर्चा उद्धव ठाकरेंशी झाली. आम्ही दोघांनी निर्णय घेतला आहे की, जनतेच्या मनात महाविकास आघाडीबाबत गैरसमज निर्माण होणे, हे आम्ही कधीही सहन करणार नाही.

शरद पवार-अजित पवारांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीला धोका आहे का? असं विचारलं असता नाना पटोले पुढे म्हणाले, लोकशाहीत जनता ही सगळ्यात महत्त्वाची असते. आम्ही मित्रपक्ष म्हणून जेव्हा एकत्रित काम करत असतो, तेव्हा लोक आम्हाला त्याच दृष्टीने पाहत असतात. पण शरद पवार- अजित पवार यांच्या “गुप्त” बैठकीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. अशा गोष्टी पुन्हा होता कामा नये, याची काळजी आम्ही दोघे (नाना पटोले व उद्धव ठाकरे) घेत आहोत. या विषयावर आम्ही चर्चा केली. पण “गुप्त” भेटीबाबत स्पष्टता यावी, अशी आमची भूमिका आहे. शरद पवारांच्या भूमिकेबाबतही आम्हाला चिंता वाटते. या मुद्यावर शिवसेना आणि काँग्रेसचे एकमत आहे.

A big question mark on Pawar’s credibility on sharad pawar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात