‘स्वातंत्र्य दिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ यांच्यातील मुख्य फरक माहीत आहे का?

75th Independence Day Know About Indias Independence Importance And Rare Facts

जाणून घ्या, या दिवशी नेमकं कशाप्रकारे केले जाते ध्वजवंदन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी अर्थात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामधील मुख्य फरक काय आहे, हे  आपणास माहीत आहे का? आपल्या देशाच्या इतिहासाबाबत प्रत्येक नागरिकाला माहीत असणे आवश्यक आहे. Know the main difference between Independence Day and Republic Day

दोन्ही दिवस देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. दोन्ही दिवशी ध्वजवंदन केले जाते. मात्र १५ ऑगस्ट जो की आपला स्वातंत्र्य दिन आहे या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करतात. कारण, देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा राष्ट्रपती पद अस्तित्वात आलेले नव्हते. तर २६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात.

१५ ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज उघडलेल्या अवस्थेत दोरीच्या सहाय्याने वर चढवला जातो, त्याला ध्वजारोहण(Flag Hositing) असे म्हणतात. तर २६ जानेवारी रोजी झेंड्याची बंद घडी करून, सरकफासाची दोरीची गाठ बांधून झेंडा अगोदरच वर नेलेला असतो, केवळ दोरी ओढून झेंडा फडकवला जातो. त्याला (Flag unfurling) असे म्हणतात.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांचा झेंडा खाली उतरवला गेला आणि भारताच तिरंगा ध्वज वर चढवला गेला म्हणून त्याला ध्वजारोहण असे म्हणतात. तर, २६ जानेवारी १९५० रोजी भारताला ध्वज होताच, परंतु स्वातंत्र्यानंतर स्वत:ची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत, अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेऊन दोरी ओढीत वरच्या वर गाठ सुटून झेंडा हवेत मोकळा केला जातो, म्हणून त्याला झेंडा फडकवणे म्हणतात. १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होते, तर २६ जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर झेंडा फडकवला जातो.

Know the main difference between Independence Day and Republic Day

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात