वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताने लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) 68 हजारहून अधिक सैनिक तैनात केले आहेत. याशिवाय हवाई दलाच्या मदतीने जवळपास 90 रणगाडे आणि शस्त्रास्त्रे लडाखमध्ये नेण्यात आली. सुखोई एसयू-30 एमकेआय आणि जग्वारसारखी विमाने 24 तास शत्रूवर लक्ष ठेवून होती. संरक्षण आणि सुरक्षा आस्थापनातील उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांची चीनी सैनिकांशी चकमक झाली. Indian Air Force equipped, 68 thousand soldiers sent to Ladakh
अल्पावधीतच सैन्य, शस्त्रे सीमेवर हलवण्यात आली सूत्रांनी सांगितले की, भारतीय हवाई दलाच्या वाहतूक ताफ्याने एका विशेष मोहिमेचा भाग म्हणून LACच्या बाजूच्या विविध कठीण भागात तत्काळ तैनातीसाठी अल्पावधीतच सैन्य आणि शस्त्रे हलवली होती. यामध्ये C-130J सुपर हरक्यूलिस आणि C-17 ग्लोबमास्टर विमानांचा समावेश होता. एकूण 9,000 टन माल वाहून नेण्यात आला.
गेल्या काही वर्षांत हवाई दलाची मोक्याची एअरलिफ्ट क्षमता वाढली असल्याचेही सूत्रांनी सांगितले. वाढता तणाव लक्षात घेता, भारतीय हवाई दलाने चिनी कारवायांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी या भागात मोठ्या प्रमाणात रिमोटली पायलटेड एअरक्राफ्ट (RPA) तैनात केले होते.
विमानातून अचूक निगराणी
पीटीआय या वृत्तसंस्थेने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, विमानांची पाळत ठेवण्याची रेंज सुमारे 50 किमी होती. चिनी सैन्याच्या स्थितीवर आणि हालचालींवर बारीक नजर ठेवण्याची लष्कराने खात्री केली. गुप्तचर माहितीही सातत्याने गोळा केली जात होती. याशिवाय लढाऊ विमानांच्या अनेक तुकड्या आक्रमक पवित्र्यात आल्या होत्या. 330 BMP पायदळ लढाऊ वाहने, रडार यंत्रणा, तोफखाना, तोफा आणि इतर अनेक उपकरणेही लडाखमध्ये हलवण्यात आली.
सीमेवर भारताकडून काय-काय तयारी?
डिसेंबर 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने ‘ऑपरेशन पराक्रम’ सुरू केले, ज्या अंतर्गत त्याने नियंत्रण रेषेवर मोठ्या संख्येने सैन्य पाठवले.
गलवान खोऱ्यातील चकमकीनंतर लष्करानेही आपली लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. अरुणाचल प्रदेशातील LAC च्या बाजूने डोंगराळ भागात सहज वाहतूक करता येण्याजोगे M-777 अल्ट्रा-लाइट हॉविट्झर्स आधीच तैनात केले आहेत.
M-777 हे चिनूक हेलिकॉप्टरवर त्वरीत हलवता येते आणि ऑपरेशनल आवश्यकतांनुसार त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्वरीत हलवण्याची लवचिकता लष्कराकडे आहे.
लष्कराने अरुणाचल प्रदेशातील आपल्या युनिट्सना मोठ्या प्रमाणात यूएस-निर्मित टेरेन डिप्लॉयमेंट व्हेइकल्स, इस्रायलकडून 7.62MM नेगेव लाइट मशीन गन आणि इतर अनेक घातक शस्त्रे सुसज्ज केली आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App