९७ टक्के मुंबईकरांनी घेतला कोरोनावरील लशीचा पहिला डोस

विशेष प्रतिनिधी

मुंबई – मुंबईतील ५५ टक्के नागरिकांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण नऊ महिन्यांत पूर्ण झाले असून ९७ टक्के जणांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे.97 percent people get vaccinated in Mumbai

मुंबईत आजवर १,३९,६६,७२६ नागरिकांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. त्यापैकी ८८,८७,८३४ पहिला डोस आणि ५०,७८,८९२ नागरिकांना लशीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. यात ८०,६९,५३३ एवढ्या पुरुषांनी लस घेतली आहे; तर या तुलनेत ५८,९३,८१३ महिलांनी लस घेतली.

उर्वरित तीन टक्के नागरिकांना ऑक्टोबर अखेरीस पहिला डोस मिळेल. सुमारे एक कोटी लोकसंख्या लसीकरणासाठी पात्र आहे. यात पहिल्या फळीतील कर्मचारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना लशीचा पहिला डोस मिळाला आहे. याशिवाय अंथरुणाला खिळलेल्या ७,५८७ नागरिकांना लशीचा डोस मिळाला आहे.

यासह, १८ ते ४४ वयोगटातील ७२,०६,६६९; तर ४५ ते ५९ वयोगटातील ३३,९७,८१६ आणि ६० वर्षांवरील २०,१३,७५५ जणांना लशीचे डोस देण्यात आले आहेत. पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पालिका विविध उपाययोजना करीत आहे. प्रत्येक प्रभागात टप्प्याटप्प्याने फिरते लसीकरण सुरू केले जात आहे.

97 percent people get vaccinated in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या