वृत्तसंस्था
पुणे : पुणे सायबर पोलिसांनी जप्त केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीवर पोलिसांच्या दोन तांत्रिक सल्लागारांनीच डल्ला मारल्याचे उघड झाले.या प्रकरणाचे धागेदोरे एका माजी बड्या अधिकाऱ्यापर्यंत गेले असून यापैकी काही कोट्यवधी रुपये त्याने स्वतःच्या खात्यातही वळविल्याचा संशय आहे. ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशनचे पंकज प्रकाश घोडे व केपीएमजीचे रवींद्र प्रभाकर पाटील यांना अटक केली आहे. जप्त केलेल्या क्रिप्टोकरन्सीची सध्याची किंमत ९० कोटी रुपयेआहे. 90 crore bitcoin scam in Pune; Police technical advisers rely on confiscated currency
देशात क्रिप्टोकरन्सी फसवणुकीचा पहिला गुन्हा सन २०१८ मध्ये पुण्यात दाखल झाला होता. या गुन्ह्यात कोट्यवधी रुपयांचे बिटकॉइन आणि इथरम हे डिजिटल चलन जप्त केले होते. याचा छडा लावण्यासाठी पंकज घोडे आणि रवींद्र पाटील या तांत्रिक तज्ज्ञांची मदत घेतली होती, परंतु या दोघांनी पोलिसांचीच दिशाभूल करीत (२४१.४७८५८०५५ बिटकॉइन्स आणि ९४.२५४१२४ इथरम आणि बिटकॉइन कॅश) करन्सी आपल्या आणि काही साथीदारांच्या वॉलेटमध्ये वळवली. या दोघांना शनिवारी त्यांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. हे प्रकरण तत्कालीन पुणे पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या कार्यकाळातील आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App