जरंडेश्वरबरोबरच असे ५५ कारखाने विकलेत, ४५ कारखाने राज्य शिखर बँकेच्या ताब्यात; गैरव्यवहाराचे सूत्रधार शरद पवार; माणिकराव जाधवांचा गंभीर आरोप


विशेष प्रतिनिधी

मुंबई – एकटा जरंडेश्वर सहकारी साखर कारखानाच नाही, तर असे ५५ सहकारी साखर कारखाने खासगी कंपन्यांना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय विकले गेलेत. ४५ सहकारी कारखाने राज्य शिखर बँकेच्या ताब्यात आहेत. त्यांचीही अशीच वासलात लावण्याचा डाव आहे. या सगळ्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याचे सूत्रधार शरद पवार आहेत, या आरोपाचा पुनरूच्चार याचिकाकर्ते माजी आमदार माणिकराव जाधव यांनी केला आहे. 55 suger factories has sale deed irregularities; sharad pawar is main accuesed, claims manikrao jadhav

शरद पवार आणि अजित पवारांनी मिळून वेगवेगळ्या लोकांच्या बनावट कंपन्या स्थापन करून महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने संपविले. मी उघडपणे शरद पवारांचे नाव घेतोय. त्यांना जर ही स्वतःची बदनामी वाटत असेल, तर त्यांनी आपल्यावर बदनामीचा खटला दाखल करावा, असे आव्हान माणिकराव जाधव यांनी शरद पवारांना दिले. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे.

ईडीने जरंडेश्वर कारखाना जप्त केला आहे. तो गुरू कमॉडिटीची मालमत्ता म्हणून जप्त केला आहे. आता अजित पवारांनी तो सोडवायला पुढे यावे असे आव्हानही माणिकराव जाधव यांनी दिले. गुरू कमॉडिटीचे भांडवल ४ लाखांचे होते. त्यांनी ६५ कोटींचे टेंडर भरले. प्रत्यक्षात रक्कम भरलीच नाही. नंतर १८ कोटी रुपयांचे कारखान्याचे सेल डीड केले. ती देखील रक्कम भरलेली नाही. ही गुरू कमॉडिटी कंपनी अजित पवारांचे मावसभाऊ राजेंद्र घाडगे यांची आहे.

ईडीचे अभिनंदन केले पाहिजे. कारण त्यांनी आर्थिक घोटाळ्याचा तपास करून मालमत्ता ताब्यात घेतली. आता ५५ कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घ्यावी. त्यांचीची सखोल चौकशी ईडीने करावी. कारण महाराष्ट्राच्या आर्थिक गुन्हे शाखेने शरद पवारांना त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत म्हणून क्लिन चिट दिली आहे. पण ईडीने जारीने तपास सुरू ठेवला आहे. तो तसाच सुरू ठेवून असेच घोटाळे करून विकलेले ५५ कारखाने ताब्यात घ्यावेत. शिखर बँकेच्या ताब्यातले ४५ कारखाने ताब्यात घ्यावेत, अशी मागणी माणिकराव जाधव यांनी केली आहे.

55 suger factories has sale deed irregularities; sharad pawar is main accuesed, claims manikrao jadhav

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात