श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ५०० डाळिंबांचा नैवेद्य ; शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट


वृत्तसंस्था

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गाभा-यात सोमवारी गणरायाला सुमारे ५०० डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला.500 pomegranates are Offered to shrimant Dagdusheth Ganpati in Pune ; Flower decoration of Sheshnag replica

आजच्या दिवशी शेषात्मज गणेशाचा अवतार झाला होता. त्यामुळे गाभाऱ्यात शेषनागाच्या प्रतिकृतीची आकर्षक पुष्पसजावट केली आहे.गणेश जयंतीनिमित्त मंदिरात सोमवारी सकाळी ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले.



भगवान ब्रह्मदेव सृष्टी रचनेच्या कार्यात असताना आपल्याच सृष्टीवर मोहित झाले. त्या मोहित अवस्थेत त्यांच्या नासिकेमधून बालक जन्माला आले. त्याला पाहून भगवान ब्रह्मदेव अधिकच मायायुक्त झाले. त्याला त्यांनी मायाकर, असे नाव दिले. वरदानही दिले.

पुढे विप्रचित्ती नामक राक्षसाने या मायाकराला राक्षसांचा राजा केले. मायाकराने अतुलनीय वरदानांवर सगळी पृथ्वी आणि स्वर्ग लोक जिंकला. त्यानंतर त्याने पाताळावर आक्रमण केले. त्याच्या वरदानासमोर निष्प्रभ झालेल्या भगवान शेषांनी शेवटी भगवान गणेशांचे स्मरण केले.

त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्री गणेश श्रीशेषात्मज रूपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्य समयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुर नामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री गणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर ,देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तिने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले.

या मूषकावर बसून श्री गणेशांनी गजासुर वध केला. याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असेही नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट व महानैवेद्य दाखविण्यात आला, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

500 pomegranates are Offered to shrimant Dagdusheth Ganpati in Pune ; Flower decoration of Sheshnag replica

महत्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात