एसटी महामंडळाला ४३९ कोटींचा फटका

विशेष प्रतिनिधी

मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण व त्यानंतर गेल्या ३५ दिवसापासून सुरु असलेला संप यामुळे महामंडळाला आत्तापर्यंत चारशे एकोणचाळीस कोटी आठ लाख इतका तोटा सहन करावा लागला आहे. तसेच प्रवाशांच्या संख्येतही घट झाली आहे. एसटी सेवा लवकर सुरू न झाल्यास प्रवासी या सेवेपासून दूर जाण्याची शक्यता आहे असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

439 crore loss to ST Corporation

महामंडळाने आव्हान केले व त्यानंतर एसटी कर्मचारी कामावर हजर होऊ लागले आहेत. दररोज एक लाख प्रवाशांची वाहतूक सध्या सुरू आहे असे राज्य परिवहन मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.


ST Strike: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कठोर कारवाई ! ७४ हजार कर्मचारी अद्याप संपात सहभागी


कोरोना संकटापुर्वी दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करीत असत तसेच २२ कोटीचे उत्पन्न होत असे. कोरोना काळात उत्पन्न फक्त १० ते ११ कोटी रुपये इतके कमी होत होते. राज्य परिवहन मंडळाची प्रवासी सेवा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे पुन्हा चांगली सुरू होईल असे प्रवाशांना वाटत होते. दिवाळीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला व त्यामुळे एसटीचे उत्पन्न व प्रवासी संख्या कमी झाली आहे.

संप २७ ऑक्टोबर पासून चालू आहे त्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन मंडळाचा संचित तोटा बारा हजार पाचशे कोटी इतका आहे. मालवाहतूक तसेच प्रवासी सेवा बंद झाल्याने महामंडळाच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. पुणे विभागातील उत्पन्नामध्ये सर्वाधिक घट झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी नजीकच्या काळात संप मागे न घेतल्यास महामंडळ आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे. विभागवार तोटा खालील प्रमाणे.

पुणे – १०९ कोटी ४२लाख. औरंगाबाद -९४ कोटी ३० लाख. मुंबई -७१ कोटी. नागपूर -४८ कोटी ७१ लाख. नाशिक – ७३ कोटी २५ लाख. अमरावती – ४२ कोटी ३८ लाख.

439 crore loss to ST Corporation

 

महत्त्वाच्या बातम्या