महावितरणच्या व्याज, दंड माफी योजनेचा महाराष्ट्रात 43345 वीज ग्राहकांना लाभ


प्रतिनिधी

पुणे : कोरोना काळात आर्थिक अडचणीमुळे अनेक नागरिकांना वीजबिल भरता आले नसल्याने कनेक्शन बंद झालेल्या ग्राहकांसाठी महावितरणने बिलावरील व्याज आणि दंड माफ करण्याची योजना महावितरणने सुरू केली होती. 43345 electricity consumers benefited from interest, penalty waiver scheme of Mahavitraan in Maharashtra

या योजनेचा पुणे विभागातील 3,886 ग्राहकांना लाभ झाला. या ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून पुन्हा सुरू करण्यात आला, तर राज्यातील 43345 ग्राहकांनी योजनेचा लाभ घेतला आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिली.

कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक वीज ग्राहकांना वेळेत बिले भरता आली नव्हती. त्यांच्या बिलाची थकबाकी होती. बिलाच्या मूळ रकमेवर व्याज जमा झाले होते. शिवाय दंडात्मक रक्कमही भरणे गरजेचे होते. यामुळे थकित रक्कम अधिक वाढली होती. थकित बिलामुळे वीज कनेक्शन तोडले गेले होते. अशा ग्राहकांना वीजपुरवठा पुन्हा सुरू व्हावा म्हणून महावितरणने ‘विलासराव देशमुख अभय योजना’ लागू केली होती.

त्यानुसार संबंधित ग्राहकांनी बिलाची मूळ रक्कम भरली तर त्यांना बिलाच्या रकमेवरील व्याज आणि दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजनेमध्ये प्रामुख्याने घरगुती ग्राहकांनी वीजबिलांची मूळ रक्कम भरून पुन्हा वीज कनेक्शन जोडून घेतले.

43345 electricity consumers benefited from interest, penalty waiver scheme of Mahavitraan in Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात