विशेष प्रतिनिधी
मुंबई – कोरोना महामारीच्या काळात आपल्या जीवाची बाजी लावून आणि परिवाराची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा देणाऱ्या ३०४ एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांनी कर्ता पुरुष गमावला आहे. तरीही अद्याप या एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्ध्यांच्या यादीत समावेश करण्यात आलेला नसल्याची खंत एसटी कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.304 ST workers died due to corona
‘केंद्र सरकारच्या कोरोना योद्धा यादीत एसटी कर्मचारी सोडून इतर अनेक कर्मचाऱ्यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना डावलण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवेतील प्रवासी सेवेची जोखीम पत्करूनही आज एसटी कर्मचारी दुर्लक्षितच आहे.
तीनशे पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही कोरोना योद्धा यादीत समावेश न करणे निंदनीय आहे,’ अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्याकडून व्यक्त केली जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App