महाराष्ट्र पोलीस दलात 29000 रिक्त पदे; किती भरती केली?, हे 9 नोव्हेंबरपर्यंत शपथपत्राद्वारे सादर करा!!; हायकोर्टाचे आदेश


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारीच नव्हे, तर अधिका-यांचीही वानवा आहे. आज सध्या अधिकारी, कर्मचा-यांची मिळून तब्बल 29 हजार 401 पदे रिक्त आहेत. राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी 5 जुलै 2022 रोजी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचे हे वास्तव उघड झाले आहे. 29000 Vacancies in Maharashtra Police Force; How many recruits?

पोलीस दलातील कामकाज सुधारावे, या अनुषंगाने कोपरगाव, अहमदनगर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय भास्कर काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. कोरोना संकटामुळे या याचिकेवरील सुनावणी दोन वर्षे लांबली.


महाराष्ट्र पोलीसांची गुंडगिरी, रिपब्लिकन टीव्हीच्या उपाध्यक्षाला पट्याने मारहाण


आता 25 जुलै 2022 रोजी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांनी त्यावर सुनावणी करताना, पोलीस दलातील रिक्त जागांबाबत 9 नोव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे. या तारखेपर्यंत किती जागा भरल्या व उर्वरित जागा केव्हा भरणार, याची माहिती शपथपत्राद्वारे मागण्यात आली आहे. वेळेत पदोन्नती दिली जात नसल्यानेही रिक्त पदे वाढत आहेत. कोरोनापूर्वी पोलीस दलात 5 % पदे रिक्त होती. कोरोनानंतर ही टक्केवारी 13 वर पोहोचली आहे.

असे आहेत याचिकेतील मुद्दे

पोलिसांची संख्या वाढवा, आठ तास ड्यूटी, रिक्त पदे भरा, वाहने अद्ययावत द्या, यंत्रणा सक्षम करा, तपासासाठी स्वतंत्र पोलीस यंत्रणा तैनात करावी, पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही असावे, शस्त्रे अद्ययावत असावीत, पोलिसांकडे इलेक्ट्रिक गन असावी, पोलीस व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी विविध योजना असाव्यात, आदी मागण्यांकडे या याचिकेतून लक्ष वेधले आहे.

29000 Vacancies in Maharashtra Police Force; How many recruits?

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात