महानगरपालिकेच्या विद्यार्थी पटसंख्येत २९ हजार वाढ हे प्रयत्नांचे यश


  • आदित्य ठाकरे यांचे गौरवोद्गार

प्रतिनिधी

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यार्थी पटसंख्येत यावर्षी २९ हजारांनी झालेली वाढ हे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांचे यश असल्याचे प्रतिपादन पर्यावरण, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. 29,000 increase in the number of students of the corporation is the success of the efforts

विविध शैक्षणिक उपक्रमांचे उदघाटन झाले. त्यात जोगेश्वरी (पश्चिम ) प्रतिक्षानगर येथील मुंबई पब्लिक स्कूलचे लोकार्पण, जोगेश्वरी (पूर्व) च्या पूनमनगर येथील मुंबई पब्लिक स्कूल मधील बास्केटबॉल कोर्टचे उद्घघाटन, दादर (पश्चिम) भवानीशंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलच्या डिजिटल क्लासरुमचे उद्घघाटन व महापालिका शाळेतील दहावी मधील सर्वोत्तम पंचवीस गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप प्रदान करण्याचा कार्यक्रम तसेच वरळी सी फेस येथील मुंबई पब्लिक स्कूलमधील खगोलशास्त्र लॅबचे उद्घघाटन यांचा समावेश होता.

भवानी शंकर रोड येथील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. परिवहन मंत्री अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकर, स्थानिक आमदार रवींद्र वायकर, स्थानिक आमदार सदा सरवणकर, आमदार सुनील शिंदे, सभागृह नेता श्रीमती विशाखा राऊत, शिक्षण समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, स्थानिक नगरसेविका प्रीती पाटणकर, स्थानिक नगरसेवक अनंत उर्फ बाळा नरे, स्थानिक नगरसेवक राजू पेडणेकर, तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.



ठाकरे म्हणाले की, कोविड -१९ मुळे दोन वर्षापासून आपण सर्वजण ऑनलाइन शिक्षण घेत होतो. मुंबईकरांची जी काही स्वप्न आहेत ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. देश, समाज नागरिकाला पुढे नेण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आगामी निवडणुका आहे म्हणून हे काम करीत नसून आम्हाला जे काही मुंबईकरांना चांगले द्यायचे आहे ते आम्ही करून दाखवित असतो. त्यासाठी सतत प्रयत्न करीत असतो. महापालिका शाळांमध्ये सुद्धा प्रवेशासाठी रांग लागली पाहिजे हे जे स्वप्न होते ते आज प्रत्यक्षात उतरत असल्याचे दिसून येत आहे.हे आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शक्य झाले आहे.

दंतचिकित्सा, मानसिक आरोग्य, करियर कौन्सिल, व्हर्च्युअल क्लासरूम या सर्व उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे हे प्रत्येक मुंबईकरांना वाटले पाहिजे या हेतूने आम्ही सर्वजण काम करीत आहोत. या दृष्टिकोनातून या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी अतिरिक्त ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

29,000 increase in the number of students of the corporation is the success of the efforts

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात