गडचिरोलीत तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान; महाराष्ट्र पोलीस c60 युनिटचे जबरदस्त यश!!


वृत्तसंस्था

नागपूर : नक्षलवाद विरोधी मोहिमेत महाराष्ट्र पोलिसांच्या c60 सिक्सटी युनिटला जबरदस्त यश मिळाले असून गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.26 Naxals have been eliminated in an encounter with the C-60 unit of Maharashtra Police in the jungles

आज दिवसभर ग्यारापट्टीच्या जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या नक्षलवाद विरोधी पथक c-60 चे युनिटची नक्षलवाद्यांशी चकमक सुरू होती. या चकमकीत 26 नक्षलवाद्यांना पोलिसांनी ठार केले आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पोलिस अधिक्षक अंकित गोयल यांनी दिली आहे.

 

नक्षलवाद विरोधी पथकाच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली विभागात मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आल्या होत्या. पोलिसांच्या गस्ती सुरू होत्या. याच वेळी काही नक्षलवाद्यांनी पोलिस युनिटवर गोळीबार केला. त्याला पोलिस युनिटने ताबडतोब प्रत्युत्तर देत नक्षलवाद्यांना जखमी केले. परंतु, नक्षलवाद्यांनी ताजी कुमक आणत पोलीस युनिटवर पुन्हा हल्ला केला. यावेळी पोलिसांनी जय्यत तयारीनिशी जबरदस्त प्रतिकार केला. या प्रतिकारामध्ये तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात नक्षलवाद प्रतिबंधक c60 युनिटला यश मिळाले अशी माहिती अंकित गोयल यांनी दिली आहे.

नक्षलवाद्यांविरुद्धचे हे ऑपरेशन अद्याप सुरू असून पोलिसांच्याही आणखी तुकड्या ग्यारापट्टी विभागात कार्यरत आहेत, असे ते म्हणाले.

26 Naxals have been eliminated in an encounter with the C-60 unit of Maharashtra Police in the jungles

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी