उल्हासनगरमध्ये आयराम, गयाराम सुरु,भाजपला खिंडार; २१ नगरसेवकांसह ११४ जणांचा राष्ट्रवादीत प्रवेश


विशेष प्रतिनिधी

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत आयराम- गयाराम प्रकार म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करण्याच्या प्रकारांना सुरवात झाली आहे. भाजपला खिंडार पाडून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला हादरा दिला आहे. भाजपच्या ३२ पैकी २१ नगरसेवकांनी तसेच वरप, म्हारळ, कांबा  ग्रामपंचायतीच्या उपसरपंच, सदस्यांसह सुमारे ११४ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी सत्ता काबीज करण्याची शक्यता आहे. 21 BJP corporators and 114 political perosons joined NCP in Ulhasnagar



राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये या सर्वांनी पक्षप्रवेश केला. ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे -पलाघर जिल्हा समन्वयक खा. आनंद परांजपे यांनी या सर्वांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी आव्हाड यांनी सौ. पंचम कलानी यांना उल्हासनगरच्या जिल्हाध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र दिले. विशेष म्हणजे टीम ओमी कलानीदेखील राष्ट्रवादीमध्ये विलीन झाली.

उल्हासनगरमध्ये पाच वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली होती. परिणामी, विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपचे कुमार आयलानी हे विजयी झाले होते. मात्र, आता भाजपच्या या बालेकिल्ल्याला राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुंग लावला आहे. टीम ओमी कलानीसह भाजपचे सुमारे २१ नगरसेवक, १९ माजी नगरसेवक, वरप, कांबाचे सरपंच, म्हारळचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य अशा सुमारे ११४ जणांनी ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे.

21 BJP corporators and 114 political perosons joined NCP in Ulhasnagar

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात