यंदा नेहमीपेक्षा जास्त कडाक्याची थंडी पडणार, हवामान खात्याचा अंदाज


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – दिल्लीसह उत्तर भारतात यंदा थंडीचा कहर होणार, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. जानेवारी-फेब्रुवारीत देशाच्या उत्तर भागात सर्वसाधारणतः पारा ३ अंश सेल्सिअसच्या आसपास उतरेल असेही या अंदाजात म्हटले आहे.Heavy winter this year says IMD

प्रशांत महासागराच्या परिसरात ‘ला नीना‘ हा घटक पुन्हा डोके वर काढत आहे. ‘ब्लूमबर्ग’च्या हवामान अंदाजानुसार याचा फटका उत्तरपूर्व आशियातील बहुतांश देशांना बसेल. आर्कटिक क्षेत्रातील कारा समुद्रात बर्फाचे प्रमाण घटल्याने वायव्य आशियात कडाक्याची थंडी पडू शकते.


हिवाळी अधिवेशन : 2 डोस घेतले तरी RTPCR अनिवार्य ; आमदारांचे स्वीय सहायक-प्रेक्षक यांना नो एन्ट्री!


ला निनाच्या परिणामस्वरूप उत्तर भारतातही जानेवारीपासून दररोजचे तापमान ३ अंश सेल्सिअस व त्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ चे अस्तित्व जाणवणे म्हणजे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील तापमानात एका झटक्यात होणारी मोठी घसरण मानली जाते.

Heavy winter this year says IMD

महत्त्वाच्या बातम्या

णारी मोठी घसरण मानली जाते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात