प्रतिनिधी
मुंबई : काही दिवसांपूर्वी पोलीस भरतीची जाहिरात आल्यानंतर महाराष्ट्रात युवक युवतींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. राज्यात 18 हजार पोलीस भरतीच्या जागा निघाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे एका उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी किमान 4 ते 5 दिवस लागत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पोलीस भरतीचा फाॅर्म भरताना परीक्षार्थींना प्रचंड त्रासाला समोरे जावे लागत आहे. 15 days extension of deadline for police recruitment applications after complaints of server down
मात्र, काही ठिकाणी सर्व्हर डाऊन झाल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारने पोलीस भरतीचे अर्ज करण्याला तब्बल 15 दिवसांची मुदत वाढ दिली आहे. त्याचबरोबर क्रिमीलेयरचे गेल्या वर्षीचे सर्टिफिकेट देखील ग्राह्य धरले जाणार आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही घोषणा केली आहे. सरकारकडे आत्तापर्यंत पोलीस भरतीसाठी तब्बल 11 लाख 80 हजार अर्ज प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
फाॅर्म भरण्याची मुदत वाढवावी
पोलीस भरतीचे फाॅर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी गडबड चालू केलेली असतानाच, ज्या वेबसाईटवरुन फाॅर्म भरला जात आहे. त्या वेबसाईटवर सर्व्हर डाऊन असल्यामुळे फाॅर्म भरताना अनेक अडचणी जाणवत आहेत. त्यामुळे फाॅर्म सबमिट करताना, किमान 4 ते 5 दिवस लागत आहेत. सांगली जिल्ह्यातील उमेदवार जिल्ह्याच्या ठिकाणी फाॅर्म भरण्यासाठी पहाटे 4.00 वाजता सांगलीत येत आहेत. त्यामुळे दिवसभर थांबूनही फाॅर्म सबमिट होत नसल्याने 30 तारखेपर्यंत फाॅर्म भरले गेले नाहीत तर भरतीसाठी जाणा-या उमेदवारांचे प्रचंड नुकसान होणार आहे. त्यामुळे 30 तारीख ही अंतिम मुदत न ठेवता ती वाढवण्यात यावी अशी मागणी आता या परीक्षार्थींनी केली आहे.
ही मागणी शिंदे – फडणवीस सरकारने मान्य करून पोलीस भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत 15 दिवसांनी वाढविली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App