11th class CET exam Date : राज्य शिक्षण मंडळाचे इयत्ता 10वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या, तरी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचे 10वीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. 11th class CET exam Date and timetable fyjc admission 2021 in maharashtra
विशेष प्रतिनिधी
पुणे : राज्य शिक्षण मंडळाचे इयत्ता 10वीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा होऊ शकल्या नव्हत्या, तरी अंतर्गत मूल्यमापनाद्वारे विद्यार्थ्यांचे 10वीचे निकाल जाहीर झाले आहेत. आता इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेशपूर्व परीक्षा (सीईटी) घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना या सीईटीसाठी 20 जुलै ते 26 जुलै या कालावधीत परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
सीईटी परीक्षा 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेतली जाईल. इंग्रजी, गणित (भाग 1 व 2), विज्ञान आणि तंत्रज्ञान (भाग 1 व 2) सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) या प्रत्येक घटकावर प्रत्येकी 25 गुणांचे एकूण 100 बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू) विचारले जाणार आहेत. कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी विषयनिहाय 25 टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला असून या अभ्यासक्रमावर सीईटीमध्ये प्रश्न विचारले जातील. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी सीईटीसाठी परीक्षा शुल्क भरावे लागणार नाहीत. मात्र, सीबीएसईसह इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेसाठी 178 रुपये शुल्क भरावे लागतील.
दरम्यान, सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल 20+80 या सूत्रानुसार जाहीर होईल. प्रत्येक विषयात 100 गुणांचा मूल्यांकन, यात 20 गुण पूर्वीप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनावर, तर 80 गुण नव्या धोरणानुसार दिले जाणार आहेत.
11th class CET exam Date and timetable fyjc admission 2021 in maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App