रुग्णालये आता रिअल इस्टेटसारखा व्यवसाय, तेथे छापले जातात कवळ पैसे – सर्वोच्च न्यायालयाचे कडक ताशेरे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रुग्णालये आता रिअल इस्टेटसारखा व्यवसाय झाला आहे. आधीच ताण तणावात असलेल्या रुग्णांना दिलासा देण्याऐवजी तो पैसे छापण्याचा उद्योग बनला आहे. हा उद्योग रुग्णांचे शोषण करत राहतो, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत.SC targets hospitals in the country

काही रुग्णालयांना इमारती वापरण्याची मुदत जून-२०२२ पर्यंत वाढवून देण्याच्या गुजरात सरकारच्या निर्णयावर न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहेत. ‘‘ सध्या रुग्णालये ही देशातील सर्वांत मोठा उद्योग बनली आहेत. या सगळा भार लोकांवर पडतो.सामान्य लोकांच्या जिवाच्या मोबदल्यात आम्ही हे सगळे होऊ देणार नाही. अशी रुग्णालये बंदच करायला हवीत.’’ असे मत न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. एम.आर. शहा यांच्या खंडपीठाने मांडले. रुग्णालयांना सूट देणारी ही अधिसूचना तातडीने मागे घेण्यात यावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

‘‘ कोरोनातून सावरलेल्या रुग्णाला उद्या डिस्चार्ज मिळणार असतो पण दुसऱ्याच दिवशी इमारतीला लागलेल्या आगीत तो मरण पावतो. यात दोन परिचारिका देखील जिवंत जळतात. या अशा प्रकारच्या दुर्घटना आमच्या डोळ्यासमोर घडल्या आहेत. त्यामुळे या रुग्णालयांना आम्ही मुदत देऊ शकत नाही.’’ असे खंडपीठाने स्पष्ट कल आहे.

SC targets hospitals in the country

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण