कोरोनापाठोपाठ आता ब्रिटनमध्ये नोरो व्हायरसचा वेगाने होतोयं प्रसार


विशेष प्रतिनिधी

लंडन – ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसनंतर आता नोरो व्हायरसची लोकांना बाधा होत असल्याचे पब्लिक हेल्थ इंग्लड (पीएचई) ने म्हटले आहे. आतापर्यंत १५४ रुग्ण आढळून आले असून वेगाने पसरणाऱ्या नोरो संसर्गाने आरोग्य विभागासमोर आव्हान उभे राहिले आहे.Noro virus spreading fast in Briton

कोरोना संसर्गामुळे ब्रिटनची आरेग्ययंत्रणा कामाला लागलेली असताना आता नोरो संसर्गाने भर पडत आहे. सीडीसीच्या मते, नोरो संसर्गाने बाधित व्यक्तीच्या थेट संपर्कात आलेला कोणत्याही व्यक्तीला नोरोना संसर्ग होवू शकतो.



दूषित आहार आणि पाण्याबरोबरच प्रदूषित भागाच्या संपर्कात आल्याने संसर्गाची बाधा होते.साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राने (सीडीसी) ने म्हटले की नोरो संसर्गामुळे नागरिकांना उलटी आणि जुलाबासारखा त्रास होतो.

पीएईने यास विंटर वोमिटिंग बग असे म्हटले आहे. नोरो संसर्गबाधित व्यक्तीकडून या आजाराचे विषाणू वेगाने पसरत असल्याचे सीडीसीने म्हटले आहे. मात्र त्यापैकी काही व्यक्तींनाच बाधा होते.

Noro virus spreading fast in Briton

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात