वृत्तसंस्था
सातारा : गडहिंग्लज कारखान्यातही १०० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप करत हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उद्या बाहेर काढणार असल्याचे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले. कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे- पवार सरकारवर कडाडून हल्ला चढवला.100 crore scam in Gadhinglaj factory too, Somaiya’s secret blast; Hasan Mushrif’s third scam will come out tomorrow
यापूर्वी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर १२७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. अधिक पाहणीसाठी ते महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरला जात होते. मात्र कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्यांना कायदा-सुव्यवस्थेमुळे जिल्हाबंदी केली. त्यानुसार पोलिसांनी सोमय्यांना पहाटे कराडमध्ये उतरवले होते.ते म्हणाले, मला हे घोटाळे उघड करण्यास देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, “मी उदाहरण देतो. २०२० मध्ये पारदर्शक लिलाव न करता हा कारखाना ब्रिक्स इंडिया प्रा लि या कंपनीला दिला. या कंपनीला साखर कारखाना चालवायाचा अनुभव नाही. पण या कंपनीला का कारखाना दिला हे शरद पवारांना माहिती आहे. कारण मतीन हसीन मंगोली हे हसन मुश्रीफ यांचे जावई असून ते ल या ब्रिक इंडिया बेनामीचे मालक आहेत.
या कंपनीत ७१८५ शेअर एस यू कॉर्पोरेषन प्रायव्हेट, ९९८ मतीन हसीनचे, तर ९९८ गुलाम हुसेनचे आहेत. म्हणजे परत सरसेनापती कारखान्यासारखे ९८ टक्के शेअर एस यू कार्पोरेशन या बेनामी कंपनीकडे. म्हणजे हसन मुश्रीफ यांनी २०१९-२० मध्ये ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर जो भ्रष्ट मार्गाने पैसा कमावला, तो इथे पास केला आहे.”
“आमची मागणी आहे, की या घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. पुन्हा आपण भेटणार इथे किंवा कोल्हापूरला. हसन मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा उघड करणार आहे”
किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
हसन मुश्रीफ साहेब १२७ कोटी रुपये आपल्या कंपनीत मनी लाँडरिंगचे आले. त्याचा हिशेब अजून का दिला नाही. शरद पवार साहेब ही तुमची व्यूवरचना आहे का.. मला चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल, बाकीचे विषय आम्ही बघतो, तुम्ही मुश्रीफांचे घोटाळे जनतेसमोर मांडा, अधिकाऱ्यांवरील गदांबाबत आम्ही बघतो.”
“मी पुन्हा सांगतो, सरसेनापती घोरपडे कारखान्यात ९८ कोटी रुपये हे बोगस कंपन्याद्वारे भ्रष्टाचाराद्वारे आणले. मुश्रीफ परिवारातर्फे २ कोटी आहे, बाकी सगळा पैसा बोगस कंपन्याद्वारे आहे.”“मुश्रीफ आणि अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखाना याचा संबंध काय? हसन मुश्रीफ यांचा दुसरा घोटाळा.
मुश्रीफ परिवाराने अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्यात १०० कोटींचा घोटाळा केला. यामध्येही शेल कंपन्यांद्वारे पैसे उभारले. बोगस अकाऊंट उघडून कॅश टाकायचे आणि पैसे घ्यायचे, १०० कोटी रुपये घेतले.”गडहिंग्लज कारखान्यातील घोटाळ्याबाबत ईडी आणि इन्कम टॅक्सकडे उद्या तक्रार करणार, असंही सोमय्या यांनी सांगितलं
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App