प्रतिनिधी
मुंबई : दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा तात्पुरता दिलासा मिळाला आहे. वैद्यकीय कारणांसाठी त्यांना जामीन दिला नसला तरी, खासगी रुग्णालयात उपचार करण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे. त्यामुळे मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. पण उपचार घेताना, रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्ताचा खर्चदेखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे. No bail, but treatment at a private hospital !!; The cost of policing is out of the pocket of the owner
वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी जामीन अर्ज
खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी जरी देण्यात आली असली तरी उपचारादरम्यान, केवळ कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती.
…म्हणून जामीन मंजूर करावा
मलिकांच्या वकिलाने नवाब मलिक यांच्यावर खासगी रुग्णालयात लवकरात लवकर वैद्यकीय उपचार होणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. मात्र, सक्तवसुली संचालनालयाने त्याला विरोध दर्शवला होता. मला मूत्रपिंडाचा आजार असून त्यामुळे पायांना सूज येत आहे. त्याशिवाय अनेक आजार आहेत. मूत्रपिंडाच्या आजारावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरुपी उपचार करण्याती इच्छा असल्याने, सहा आठवड्यांपुरता जामीन मंजूर करावा, असा अर्ज मलिक यांनी केला होता.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App